

Mobile Tips : मोबाईलच्या कव्हर हा खरंतर मोबाईलच्या सुरक्षेसाठी असतो. मात्र, कित्येक लोक त्याचा वापर एक प्रकारचं पॉकेट म्हणून करतात. फोनच्या कव्हरमध्ये नोटा, व्हिजिटिंग कार्ड, किंवा अशाच प्रकारच्या गोष्टी ठेवण्याची सवय कित्येकांना असते. तुम्हालाही अशीच सवय असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल फोन ब्लास्ट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यांपैकी काही घटनांमध्ये फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेले कागद हे मुख्य कारण होतं, असं अहवालांमध्ये समोर आलं आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
फोनचा ब्लास्ट होण्याची कित्येक कारणं आहेत. मात्र, त्यातील एक कारण हे कव्हरमध्ये ठेवलेली नोटही असू शकतं. जेव्हा फोन अधिक वेळ वापरला जातो, तेव्हा तो अधिक गरम होतो. अशा प्रकारे ओव्हरहीट झाल्यामुळे फोन ब्लास्ट होण्याची शक्यता असते. (Mobile Cover Tips)
खरंतर, कोणताही मोबाईल हा कव्हरशिवाय वापरण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला असतो. कव्हर नसल्यास फोन वेगाने थंड होऊ शकतो. मोबाईल कव्हरमुळे तो थंड होण्यास वेळ लागतो. कव्हरमध्ये नोट किंवा कागद ठेवल्यास मोबाईल थंड होऊ शकत नाही, आणि ओव्हरहीटिंगने ब्लास्ट होऊ शकतो.
केवळ कव्हरमध्ये पैसे ठेवल्यानेच नाही, तर जाड कव्हर वापरल्यामुळे देखील असाच धोका संभवतो. फोनचं कव्हर निवडताना त्यावरचं डिझाईन किंवा चित्रं पाहण्यापेक्षा आपल्या फोनला मिळणारी सुरक्षा लक्षात घेणं गरजेचं आहे.
फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यामुळे वायरलेस चार्जिंगला अडथळा निर्माण होऊ शकतो. तसंच कित्येक वेळा यामुळे नेटवर्क इश्यूही येऊ शकतो. त्यामुळे फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय शक्य तितक्या लवकर सोडणंच फायद्याचं ठरतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.