Motorola G71 : स्वस्तात खरेदी करा 5G स्मार्टफोन; मिळतोय बंपर डिस्काउंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

motorola g71 5g smartphone price specifications  in india and check flipkart discount offers

Motorola G71 : स्वस्तात खरेदी करा 5G स्मार्टफोन; मिळतोय बंपर डिस्काउंट

जर तुम्ही नवीन फोन विचार करत असाल, तर तुमला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) च्या धमाकेदार सेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन ऑप्शन्स मिळणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, टिव्ही अशा अनेक प्रॉडक्ट्सवर बंपर ऑफर्स देखील मिळणार आहेत..

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने नुकताच Moto G71 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या महिन्यात इतर देशांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असून Moto G71 स्मार्टफोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देखील मिळणार आहे.

काय खास आहे (Moto G71 5G specifications)

नवीन Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी + मॅक्स व्हिजन AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह देण्यात येत आहे, ज्यामध्ये 6 जीबी रॅम उपलब्ध असेल.

Moto G71 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात मिळेल आणि त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे. यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हेही वाचा: Amazon वर येतोय रिपब्लिक डे सेल; स्मार्टफोन, लॅपटॉपवर मिळेल बंपर सूट

पावरफुल बॅटरी

Moto G71 5G फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 33W टर्बो पॉवर चार्जरद्वारे फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असून फोनची स्टोरेज क्षमता 1288 GB आहे. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोन IP52 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो वॉटर रेजिस्टंट असेल.

किंमत काय आहे

Moto G71 5G फोनची विक्री फ्लिपकार्टवर 19 जानेवारीपासून सुरू होईल. वेबसाइटवर त्याची किंमत 22,999 रुपये दाखवण्यात आली आहे. डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन 18,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनच्या सेलमध्ये विविध बँकांकडून ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 5% कॅशबॅक दिला जात आहे. जर तुम्हाला EMI वर फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Moto G71 फक्त 659 रुपयांच्या हप्त्यांवर खरेदी करू शकता.

हेही वाचा: Flipkart चा बंपर सेल! फोन, टीव्हीवर मिळतेय 80% पर्यंत सूट

बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Saving Day Sale)

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट 17 जानेवारीपासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू करणार आहे. हा सेल 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या 6 दिवसांच्या सेलमध्ये बंपर डिस्काउंटसोबतच आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत. यामधेयो बँकेच्या विविध ऑफर देखील मिळणार आहेत.

Filpkart.com नुसार, बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. येथे तुम्ही कॅमेरा, इयरफोन, ट्रिमरसह सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :flipkart
loading image
go to top