Moto G32 चा नवीन व्हेरिएंट 22 मार्चला होणार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफीकेशन्स

Moto g32 Specifications and price
motorola moto g32 8gb and 128gb variant launch in india on 22 march 2023 check price and specifications
motorola moto g32 8gb and 128gb variant launch in india on 22 march 2023 check price and specifications

Moto g32 Specifications and Price in India: Motorola चा नवीन व्हेरिएंट Moto G32 भारतात 22 मार्च रोजी लॉन्च होणार आहे. Moto G32 भारतीय बाजारात 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह आधीच उपलब्ध आहे पण आता तो 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह लॉन्च केला जात आहे.

Moto G32 ची किंमत 11,999 रुपये असेल. मोटोरोला इंडियाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. मोटो G32 भारतात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च झाला होता.

Moto G32 चे स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा

Moto G32 मध्ये Android 12 आधारित स्टॉक Android चा एक्सपिरिएंस पाहायला मिळेल. ThinkShield च्या सुरक्षिततेसोबत, फोनला वॉटर आणि डस्ट रेसिस्टंटसाठी IP52 रेटिंग देखील मिळते. तसेच, फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि 1,080x2,400 पिक्सेल रिझोल्यूशन दिले जात आहे.

स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि स्पोर्ट्स स्टिरीओ स्पीकरसह डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि ड्युअल मायक्रोफोन देखील उपलब्ध आहेत.

हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

motorola moto g32 8gb and 128gb variant launch in india on 22 march 2023 check price and specifications
Manish Kashyap : मनीष कश्यपने पोलिसांना कसा चकमा दिला? शेतातून पाळाला, पण अखेर…
motorola moto g32 8gb and 128gb variant launch in india on 22 march 2023 check price and specifications
Amruta Fadnavis Blackmail Case : जयसिंघानी ७२ तास देत होता गुंगारा; पोलिसांनी सांगितला अटकेमागचा घटनाक्रम

मोटो G32 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल चा प्रायमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स मिळते.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आले आहे.

Moto G32 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 30W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.2 आणि NFC यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com