Movie Download : पायरेटेड मूव्ही डाउनलोड करण्याचा नवा अड्डा बनलाय ट्विटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie Download

Movie Download : पायरेटेड मूव्ही डाउनलोड करण्याचा नवा अड्डा बनलाय ट्विटर

Movie Download : पायरेटेड किंवा लीक झालेले चित्रपट डाउनलोड करण्यासाठी लोक टेलिग्रामवर लिंक्स शोधायचे. पण आता ते दिवस गेलेत. या अॅपमध्ये विनामूल्य चित्रपट किंवा शो पाहण्यासाठी लिंक असायच्या. पण टेलिग्रामचा जुगाड संपला तेव्हा लोकांनी नवी पद्धत शोधून काढली.

या कामासाठी आता ट्विटरचा वापर केला जातोय. फ्रीचे चित्रपट डाउनलोड करण्यासाठी युजर्स अधिकाधिक ट्विटर वापरत आहेत. अलीकडेच असं दिसून आलंय की अनेकजण मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर चित्रपट अपलोड करतायत. आणि हे चित्रपट कोणीही डाउनलोड करू शकतं.

विनामूल्य चित्रपट आणि वेब सिरीज डाउनलोड करण्यासाठी ट्विटर अधिक लोकप्रिय होत आहे. एलोन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर श्रेक आणि एव्हिल डेड सारखे चित्रपट अपलोड करण्यात आलेत.

जॉन विक चॅप्टर 4 हा चित्रपट जॉन विक डेड वाईफ (@ghoulha) नावाच्या युजरने ट्विटरवर अपलोड केला होता. हा चित्रपट जवळपास 10 तास सोशल प्लॅटफॉर्मवर होता. यानंतर तो काढण्यात आला.