लाईव्ह न्यूज

Mumbai Mosques Go Digital: मुंबईत 'अजान'अ‍ॅप, लाऊडस्पीकर वादामुळे मशिदी झाल्या डिजिटल; कसं वापरायचं?

How to use Azan App in Mumbai: लाऊडस्पीकर बंदीनंतर मुंबईतील मशिदींनी 'अजान अ‍ॅप'द्वारे डिजिटल अजान सुरू केली आहे.
Mumbai Mosques Launch Azaan App | Digital Azaan Replaces Loudspeakers
Mumbai Mosques Launch Azaan App | Digital Azaan Replaces Loudspeakerssakal
Updated on: 

Azaan App Launched by Mahim Mosque in Mumbai: मुस्लिम बांधव नमाजासाठी दिवसातून पाच वेळा मशिदीत अजान दिली जाते. ही अजान लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात दिली जाते, त्यामुळे काहींना त्याचा त्रास होतो, अशी तक्रार अनेकांनी केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी काही मशिदींवर लाऊडस्पीकर काढण्याचा आग्रह धरला.

या पार्श्वभूमीवर, काही मशिदींनी अजानसाठी मोबाईल अ‍ॅपचा पर्याय निवडला आहे. ‘ऑनलाइन अजान’ नावाचं हे अ‍ॅप तामिळनाडूमधील स्वयंसेवकांनी तयार केलं असून तिथे गेली तीन वर्षे वापरलं जात आहे. आता मुंबईतही हे अ‍ॅप वापरलं जात आहे.

या अ‍ॅपमुळे अजान थेट मोबाइलवर ऐकायला मिळते. त्यामुळे ज्या व्यक्ती कामामुळे घराबाहेर असतात किंवा मशिदीपासून दूर असतात, त्यांनाही वेळेवर अजान कळते.

मुंबईत मात्र या अ‍ॅपचा वापर मुख्यतः पोलिसांच्या लाऊडस्पीकर बंदीमुळे केला जात आहे. महिम येथील जुम्मा मशीद ही पहिली मशीद ठरली, जिने हे अ‍ॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. मशीदीचे विश्वस्त फहाद खलिल पठाण यांनी सांगितलं की, तामिळनाडूतील तज्ज्ञांच्या मदतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आलं असून अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही फोनवर ते मोफत उपलब्ध आहे.

शहरातील अनेक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काँग्रेसचे शहर सरचिटणीस असीफ फारूकी म्हणाले, “लाऊडस्पीकरवर अजान देणं बंधनकारक नाही, पण नमाज अदा करणं गरजेचं आहे. त्यामुळे अ‍ॅपसारख्या पर्यायांचा वापर करावा.”

हे अ‍ॅप इतर अ‍ॅप्सप्रमाणे केवळ अजानची वेळ सांगत नाही, तर निवडलेल्या स्थानिक मशिदीतून थेट अजान ऐकवतो.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी गेल्या काही आठवड्यांत सुमारे १५०० मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवले आहेत. मशिदीच्या समित्यांचा दावा आहे की त्यांनी ठरवलेली ध्वनी मर्यादा (दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल) पाळली होती. तरीही पोलिसांनी लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नवीन परवानगी मिळेपर्यंत लाऊडस्पीकर न वापरण्याचा सल्ला दिला गेला आहे.

या प्रकरणी मुस्लिम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्या वेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवन भारती उपस्थित होते. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसारच कारवाई होत असल्याचं सांगितलं.

या सगळ्या घडामोडींमुळे अजानसाठीचा डिजिटल पर्याय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com