घरातली उपकरणे बंद-सुरू करा कुठूनही एका क्लिकवर!

mobile app
mobile app

मुंबई - अरे रे..एसी बंद करायचा राहिला.. आतल्या खोलीतला दिवाही बंद करायला विसरलो किंवा विसरले अशा आरोळ्या प्रत्येकांच्या कानावर अधूनमधून पडत असतात . मात्र अशा विसरण्याच्या सवयीला कायमचा पूर्ण विराम देण्यासाठी चेतन बाफना यांनी ‘लोकेटेड’ नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणतेही उपकरण सुरू राहिल्यास ते तुम्ही कुठूनही अॅपने बंद करू शकणार आहात. एवढेच नव्हे तर अॅपच्या मदतीने बाहेरून घरी जाताना घरी पोहोचण्यापूर्वीच तुम्ही एसी सुरू करून आपली खोली थंडगार करू शकणार आहात.

सध्या मुंबई शहरात ओमकार, रहेजा युनिव्हर्सल, सनसिटी डेव्हलपर्स, सीबीआरई, नीलम रिएलटर्स, पीएसआयपीएल (कल्पतरू ग्रुप कंपनी) या संकुलात ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत दहा हजार लोकांनी  ‘लोकेटेड’ अॅप डाऊनलोड केले आहे. नव्या काळानुसार तंत्रज्ञानात बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य लोकांना फायदा व्हावा, वेळेची बचत व्हावी, याकरता हे ‘लोकेटेड’ अॅप विकसित करण्यात आहे. जगण्याचा वेग इतका वाढला आहे की, अनेकदा घरातले अनेक महत्त्वाचे उपकरण बंद करण्यास लोक विसरतात, अशावेळी सुरक्षेच्या दुष्टिकोनातूनही अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी ‘लोकेटेड’ अॅप अतिशय उपयोगाचे ठरू शकते असे लोकेटेडचे ​​संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन बाफना यांनी सांगितले.

‘लोकेटेड’ अॅप कसे चालते?

आयटी तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकटेडची संपूर्ण सिस्टिम चालते. घरात एक डिव्हाइस बसवले जाते. त्यावर सेंसर असतात. जे विद्युत उपकरणाला जोडले जातात. इंटरनेटच्या माध्यमातून त्याला कंट्रोल केले जाते. एखादं उपकरण सुरू राहिल्यास ते बंद करण्याचा पर्याय देण्यात येतो. तसेच एखादं उपकरण सुरू करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहे. उदा. उन्हातून घरी जाताना घरात जाण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या घरातला एसी सुरू करू शकता. जेणे करून तुम्ही घरी पोहोल्यावर खोली पूर्णपणे थंडगार असेल. ही प्रणाली सध्या संकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून प्ले स्टोअरवर लोकेटेड अॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com