फेसबुकवर लवकरच दोन नवीन फीचर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - फेसबुकवरील सध्या सर्वांत लोकप्रिय असलेले फीचर "फेसबुक लाइव्ह'साठी लवकरच दोन नव्या फीचरचा वापर करता येणार आहे. फेसबुक 'Live Chat With Friends' आणि 'Live With' असे दोन पर्याय देणार आहे.

मुंबई - फेसबुकवरील सध्या सर्वांत लोकप्रिय असलेले फीचर "फेसबुक लाइव्ह'साठी लवकरच दोन नव्या फीचरचा वापर करता येणार आहे. फेसबुक 'Live Chat With Friends' आणि 'Live With' असे दोन पर्याय देणार आहे.

फेसबुक लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये आपल्या मित्रांशी चॅट करण्याचा थेट पर्याय "Live Chat With Friends' या फीचरमुळे वापरता येईल. फेसबुक ग्रुपवर अनोळखी व्यक्तींना कमेन्ट, चॅट या पर्यायामुळे दिसणार नाहीत. केवळ मित्रांनाच हा पर्याय वापरता येईल. लाइव्ह स्ट्रिममध्ये मित्रांनाही चॅटसाठी बोलावता येणार आहे. हे फीचर मोबाईलवर देण्यात येईल.

'live With' या फीचरद्वारे ठराविक ठिकाणच्या फेसबुक यूझरव्यतिरिक्त अन्य यूझरनाही व्हिडिओ पाहण्याची संधी मिळणार आहे. लॅण्डस्केप आणि पोर्ट्रेट अशा दोन्ही फ्रेममध्ये या व्हिडिओचे चित्रीकरण करता येईल. फेसबुकवर असणाऱ्या कोणत्याही यूझरला लाइव्ह पाहता येईल, असा पर्याय या फीचरमुळे मिळेल. आपला व्हिडिओ कोणत्या यूझरना दिसावा, यासाठीही फेसबुक वापरकर्त्यांकडे पर्याय असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news two new feature on facebook