Sunita Williams Explainer : गेले 6 महिने अन् पुढचे 2 महिने अंतराळात अडकून राहणाऱ्या सुनीता विल्यम्ससोबत नेमकं काय सुरुय? जाणून घ्या

Sunita Williams Latest Update : सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोअर यांनी अंतराळात सहा महिने पूर्ण केले असून, त्यांचा प्रवास आणखी दोन महिने सुरू राहणार आहे.
Sunita Williams Latest Update
Sunita Williams Space Journeyesakal
Updated on

Sunita Williams Space Update : नासाच्या अंतराळवीरांनी अंतराळात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोअर यांनी अंतराळात सहा महिने पूर्ण केले असून, त्यांचा प्रवास आणखी दोन महिने सुरू राहणार आहे. या प्रवासाने अनेक आव्हानं निर्माण केली असली तरी त्यांनी त्यावर मात करत आपला वेळ सकारात्मकपणे घालवला आहे.

अंतराळात अडकले तरीही आत्मविश्वास कायम

या वर्षी जून महिन्यात एका छोट्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोअर यांना अंतराळात पाठविण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या बोईंग स्टारलाइनर यानामध्ये प्रोपल्शन लीक झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) थांबावं लागलं. यामुळे त्यांचा प्रवास फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढला आहे.

अंतराळातील सण उत्साहात साजरे

आंतराळात अडकूनही त्यांनी सण साजरे करण्याचा आनंद घेतला. थँक्सगिव्हिंगसाठी त्यांनी डिहायड्रेटेड स्पेस पाऊचमधून मिळणाऱ्या मॅश पोटॅटो, ग्रीन बीन्स, मशरूम्स, स्मोक्ड टर्की, क्रॅनबेरी आणि अॅपल कॉब्लर यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर निक हेग, डॉन पेटिट आणि तीन रशियन अंतराळवीर होते.

Sunita Williams Latest Update
Instagram Fraud : इंस्टाग्राम रील बघणं पडलं महागात! एका क्लिकमध्ये गमावले ६ लाख रुपये, नेमकं प्रकरण काय?

सुनिता विल्यम्स काय म्हणाल्या?

सुनिता विल्यम्स यांनी सांगितलं की, "आमचं वेळापत्रक व्यवस्थित आहे. आम्ही व्यायाम करत आहोत, चांगलं खाणं खात आहोत, आणि अंतराळातही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहोत. काळजीचं काही कारण नाही."

फेब्रुवारी 2025 मध्ये निक हेग आणि अलेक्झांडर गोबोर्नोव यांच्या स्पेसएक्स मोहिमेचा शेवट झाल्यानंतर विल्यम्स आणि विलमोअर शेवटी पृथ्वीवर परततील.

Sunita Williams Latest Update
Dog-human Relationship : कुत्रा अन् मानवाची मैत्री 12 हजार वर्षांपूर्वीची! संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

सकारात्मक दृष्टिकोनाची प्रेरणा

विल्यम्स आणि विलमोअर यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायक आहे. अडचणींच्या काळातही त्यांनी दाखवलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द अनेकांना प्रोत्साहन देणारी ठरली आहे. आता भारतासह संपूर्ण जगाला त्यांच्या पृथ्वीवर परतीची आस लागली आहे. येत्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात ते परत येतील अशी माहिती नासाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com