National Science Day : नविन शोधतर लावलाय, पेटंट कसं मिळवायचं माहितीये l National Science Day 2023 How To get Patent | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How To get Patent

National Science Day : नविन शोधतर लावलाय, पेटंट कसं मिळवायचं माहितीये?

How To get Patent : गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं ते उगाच नाही. अनेकदा हे सिद्ध झाले आहे की, एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवू लागली की, ती भरून काढण्यासाठी काहीतरी जुगाड केला जातो आणि यातूनच बरेच शोध जन्माला आले आहेत हे आपण जाणतो. पण हे शोध आपण घेतलेल्या कष्टातून लागलेले असल्याने ते आपल्याच नावावर राहणं पण आवश्यक असतं ना... त्यासाठी तो शोध आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्याचं पेटंट करणं आवश्यक असतं.

तुम्हाला माहित आहे का की अधिकृतरीत्या नोंदणी होईपर्यंत जगात कोणतीही गोष्ट कायदेशीररित्या अस्तित्वात नाही. याचा अर्थ जर तुमच्या मनात एखादी कल्पना असेल आणि ती पद्धत किंवा ती अनोखी कल्पना इतर कोणीही वापरू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमची कल्पना “पेटंट” केली पाहिजे. 

पेटंटमध्ये संपूर्णपणे नवीन सेवा, तंत्रज्ञान, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाइनसाठी एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिलेला हक्क आहे. जेणे करून कोणीही त्याची कॉपी करू शकणार नाही.

पेटंट धारक व्यतिरिक्त एखादी व्यक्ती किंवा संस्था तेच उत्पादन बनवत असेल तर ते बेकायदेशीर ठरेल आणि पेटंटधारकाने त्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यास पेटंटचे उल्लंघन करणारा कायदेशीर अडचणीत येईल.

पण जर कोणाला हे उत्पादन बनवायचे असेल तर त्याला पेटंटधारक व्यक्ती किंवा संस्थेची परवानगी घ्यावी लागेल आणि रॉयल्टी द्यावी लागते.

पेटंटचे प्रकार

उत्पादन पेटंट - ज्या उत्पादनाचं तुम्ही पेटंट घेतलं आहे त्याची हुबेहुब कॉपी कोणीही करु शकणार नाही. तसं जर कोणी केलं तर त्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकतात किंवा रॉयल्टी मागू शकाल.

प्रक्रिया पेटंट - कोणत्याही नवीन तंत्राज्ञान पेटंट घेता येते. या प्रकारच्या पेटंटचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था तुम्ही ज्या पद्धतीचे पेटंट घेतले आहे त्याची चोरी इतर कोणी करू शकत नाही.

पेटंट कसे मिळवावे?

 • प्रत्येक देशाचं पेटंट ऑफिस असतं.

 • तुमच्या नाविन्यपूर्ण शोधाचा तपशीलांसह अर्ज करावा लागतो. पेटंट ऑपीस त्याची तपासणी करतं.

 • तुमचा अर्ज पेटंटच्या प्रकारात बसत असेल त्यानुसार पेटंट ऑर्डर जारी केली जाते.

 • ज्या देशाचं पेटंट तुम्ही घेतलं असेल त्याच देशापुरतं ते पेटंट चालतं परदेशात चालत नाही. त्यामुळे जर तुम्हाला ज्या ज्या देशांसाठी पेटंट हवं असेल त्या त्या देशात स्वतंत्र पेटंट घ्यावं लागतं.

 • पेटंट प्रक्रियेचा खर्च महाग आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या उत्पादनाचं पेटंट हवंय त्या बाजारात किती मागणी आहे हे आधीच तपासणे आवश्यक असते.

पेटंट अर्ज भरताना हे लक्षात ठेवा

 • अर्ज भरण्यापूर्वी, आविष्कार नीट तपासा.

 • प्रत्येक कागदपत्र तयार ठेवा,थोड्याशा चुकीमुळे तुमची पेटंट फाइल नाकारली जाऊ शकते.

 • पेटंट जारी करण्यासाठी 3 वर्षे लागू शकतात. जर तुम्ही पहिल्यांदा पेटंट घेत असाल, तर पेटंट अर्ज नाकारला जाण्याची शक्यता जास्त आहे.

 • तुम्ही त्यात आवश्यक सुधारणा करून पुन्हा प्रयत्न करू शकता.

 • पेटंट नोंदणीसाठी तुम्ही एजंटचीही मदत घेऊ शकता.

 • असा पेटंट एजंट निवडावा जो पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्क्सच्या कंट्रोलर जनरलने प्रमाणित केलेला असेल.

 • तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील दाखल करू शकता. यासाठी http://www.ipindia.nic.in वर जा आणि पेटंट विभागात जाऊन पेटंटसाठी व्यापक eFiling Services वर अर्ज करा.

 • अनेकदा असे आढळून आले आहे की पेटंट मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान लोक ‘Patent Pending’ किंवा ‘Patent Applied For’ लिहून काम करत राहतात. पण त्याला कायदेशीर वैधता नाही.

 • या कालावधीत पेटंटच्या उल्लंघनाबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही.

टॅग्स :Patent law