Netflix OTT : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर केल्यास भरावे लागणार अतिरिक्त शुल्क? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Netflix News

Netflix OTT : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर केल्यास भरावे लागणार अतिरिक्त शुल्क?

OTT प्लॅटफॉर्म Netflix ने पासवर्ड शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याची तयारी केली आहे. OTT प्लॅटफॉर्मच्या संथ वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे पासवर्ड शेअरिंग असल्याचे कंपनीने म्हटले आहे. OTT प्लॅटफॉर्म हे आता पुढेचे भविष्य आहे. हे लक्षात घेऊन, कंपनी 2023 पासून त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर करणार्‍या वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारेल.

Netflix ची काय आहे भूमिका? -

नेटफ्लिक्सचा त्रैमासिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. अहवालाच्या प्रकाशनावेळी, नेटफ्लिक्सने सांगितले की, पासवर्ड शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 पासून वापरकर्त्यांकडून जास्त प्रमाणावर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

हेही वाचा: Reliance Jio दिवाळी धमाका! Jio 5G, 4G फोन वापरकर्त्यांसाठी ‘ही’ आहे खास ऑफर

पासवर्ड शेअरिंगमुळे कंपनीला तोटा -

नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगहाई लाँग म्हणाले की, नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना नेटफ्लिक्सचे चित्रपट आणि टीव्ही शो आवडतात. चित्रपट आणि टीव्ही शो आवडल्यामुले अधिकाधिक लोक सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे, मित्रांमध्ये खात्याचा पासवर्ड शेअर केल्यामुळे, अधिक सदस्य Netflix चे सदस्यत्व घेत नाहीत. यामुळे वापरकर्ते वाढत नाहीत आणि कंपनीचे नुकसान होते.

टॅग्स :Netflixaccount