पिक्सोपलच्या शॉपीफाय या नव्या अॅपने तुमच्या छायाचित्रांना बनवा आकर्षक 

अशोक गव्हाणे
गुरुवार, 14 जून 2018

छायाचित्रांना आकर्षक बनवण्यासाठी पिक्सोपल नावाच्या जागतिक कंपनीने एक शॉपीफाय नावाचे अॅप बनवले आहे. हे अॅप कमी वेळात छायाचित्रांना अधिक आकर्षक बनवते. या अॅपमुळे छायाचित्र संकेतस्थळावर उठावदार दिसते. छायाचित्राचा आकार बदलण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर, या अॅपमधून छायाचित्राला नैसर्गिक व आकर्षक रुप देता येते. म्हणजेच, विविध वैशिष्टयांच्या माध्यमातून छायाचित्रांच्या गुणवत्तेत वाढ करण्यास हे अॅप मदत करते.

न्यूयॉर्क(अमेरिका)- छायाचित्रांना आकर्षक बनवण्यासाठी पिक्सोपल नावाच्या जागतिक कंपनीने एक शॉपीफाय नावाचे अॅप बनवले आहे. हे अॅप कमी वेळात छायाचित्रांना अधिक आकर्षक बनवते. या अॅपमुळे छायाचित्र संकेतस्थळावर उठावदार दिसते. छायाचित्राचा आकार बदलण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर, या अॅपमधून छायाचित्राला नैसर्गिक व आकर्षक रुप देता येते. म्हणजेच, विविध वैशिष्टयांच्या माध्यमातून छायाचित्रांच्या गुणवत्तेत वाढ करण्यास हे अॅप मदत करते.
 
हे अॅप लॉंच करताना, पिक्सोपलचे जागतिक विक्री प्रमुख क्रिस कोलेन्टी म्हणाले की, ऑनलाईन स्टोअरसाठी उत्पादनांच्या प्रतिमांना मोहकपणा देण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे. पिक्सोपलने ई-कॉमर्स क्षेत्रातील आपल्या प्रचंड अनुभवाचा वापर करून हे अॅप तयार केले आहे. जे ग्राहकांना तात्काळ परिणाम दईल. पिक्सोपलचे हे ऑन-डिमांड फोटो एडिटिंग अॅप पहिल्या तीन सुविधा विनामूल्य देणार आहे. कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक परिणामकारकता देणारे पिक्सोपल चे हे अॅप इतरांपेक्षा वेगळे आहे.

थम्ब्स पेट्सच्या संचालक डायना पिक्सोपल प्लग-इनच्या सुलभ वापराबद्दल बोलताना म्हणाल्या की, माझ्याकडे अनेक प्रतिमा होत्या आणि पिक्सोपलमुळे त्यांच्यात बदल करुन त्या मी चांगल्या बनवल्या. हे अॅप पुढेही सातत्याने वापरण्याची माझी इच्छा आहे.
 
शॉपीफायचे हे अॅप स्टोअर वरून इन्स्टॉल करण्यासाठी https://apps.shopify.com/pixopal या संकेतस्थळाचा वापर करा. त्याचबरोबर, अॅपच्या अधिक माहीतीसाठी www.pixopal.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा @pixopal.com वर संपर्क साधा. हे अॅप तुमच्या सर्व छायाचित्रांना आकर्षक रूप देऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The new app by pixopal for Shopiefi will make your photos look attractive