esakal | Google Messages ऍपमध्ये आलं नवीन भन्नाट फिचर; आता करता येईल मेसेजही शेड्यूल
sakal

बोलून बातमी शोधा

google messages

मेसेज शेड्यूल करण्याचं फिचर वापरण्यास अतिशय सोपे आहे. आपण आपला मेसेज टाइप करा आणि Send हे बटण दाबून ठेवा...

Google Messages ऍपमध्ये आलं नवीन भन्नाट फिचर; आता करता येईल मेसेजही शेड्यूल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: आता ईमेलसारखे मेसेजही शेड्यूल करता येणार आहेत. गूगलचं मेसेजिंग ऍप Google Messages मध्ये ही सुविधा देणार आहे. फीचरचे नाव शेड्यूल सेंड (Schedule Send) असं असेल.  या ऍपद्वारे यूजर्संना मेसेजची वेळ सेट करता येणार आहे. वेळ ठरवल्यानंतर त्यावेळेस तो मेसेज आपोआप जाईल. Android Police च्या रिपोर्टनुसार या फिचरची माहिती सुरुवातीला नोव्हेंबर 2020 मध्ये समोर आली होती. त्यानंतर आता हे फिचर युजर्ससाठी उपलब्ध केलं जाणार आहे.

असं करा मेसेड शेड्यूल-
मेसेज शेड्यूल करण्याचं फिचर वापरण्यास अतिशय सोपे आहे. आपण आपला मेसेज टाइप करा आणि Send हे बटण दाबून ठेवा. त्यानंतर तुम्हाला वेळ सेट करण्यास सांगितले जाईल. वेळ सेट केल्यानंतर तुम्ही तारीख देखील सेट करू शकता. त्यानंतर सेंड या बटनावर दाबल्यानंतर हा मेसेज शेड्यूल होईल.

Holi Special sale! घरगुती सामानापासून स्मार्टफोनपर्यंत; Paytm वर मिळणार भरघोस...

जर काही कारणास्तव तुम्हाला जर तो मेसेज रद्द करायचा असेल तर तुम्ही तो रद्द करू शकाल. तसेच तो मेसेज तुम्ही लगेचही पाठवू शकता. मेसेज शेड्यूल केल्यानंतर महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल ऑन असला पाहिजे. तसेच तुम्ही गूगल मेसेज चॅट फिचर वापरत असाल तर तुमच्या मोबाईलचं नेटही चालू असलं पाहिजे.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीये का? मग घाबरू नका; अशी नोंदवा तक्रार; न्याय...

रिपोर्टनुसार, हे फिचर आता काही यूजर्सपर्यंत जात आहे. तुमच्याकडे जर हे फिचर अजून नसेल तर ते अजून तुमच्या मोबाईलमधील ऍपमध्ये ऍक्टीव्हेट झालं नसेल. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मेसेज ऍप नसेल तर ते तुम्ही गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.

loading image
go to top