Smart TV : Xiaomi चा छोटू डिव्हाइस घरातल्या टीव्हीला बनवणार 4k | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Xiaomi TV Stick 4K

Smart TV : Xiaomi चा छोटू डिव्हाइस घरातल्या टीव्हीला बनवणार 4k

New Xiaomi TV Stick 4K : आज प्रत्येकाला स्मार्ट टीव्ही घ्यायचा आहे. काहींना ते शक्य होतं तर, काहींना त्यांच्या हौसेला पैशाअभावी वेसणं घालावं लागतं.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

मात्र, आता तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा Xiaomi ने उचललं आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच 'व्हॉलेंटाईल डे' ला Xiaomi तुमच्या घरातील सामान्य टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये बदलण्यासाठी एक छोटसं उपकरण घेऊन येत आहे.

येत्या 14 फेब्रुवारीला Xiaomi नवीन 4K टीव्ही स्टिक लॉन्च करणार आहे. याबाबत कंपनीने ट्वीट केले आहे.

या ट्वीटमध्ये कंपनीने म्हटले आहे.की, Xiaomi ची नवीन आणि प्रगत Xiaomi TV Stick 4K 14 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार असून, सर्वात मोठा मनोरंजनाचा अनुभव आता तुमच्या बोटांच्या एका क्लिकवर असेल.

Xiaomi च्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच Mi TV Stick आहे. त्याची किंमत 2999 रुपये आहे.

नव्याने लाँच करण्यात येणाऱ्या या स्टिकची किंमत नेमकी किती आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही. मात्र, आधीच्या स्टिकपेक्षा नव्या Xiaomi TV Stick 4K ची किंमत जुन्या स्टिकपेक्षा जास्त असू शकते.

नव्या स्टिकची ही आहेत वैशिष्ट्ये

  • Xiaomi कंपनीकडून 14 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात येणाऱ्या Xiaomi TV Stick 4K पोर्टेबल डिझाइन देण्यात आले आहे.

  • ही स्टीक 4K HDR स्ट्रीमिंगला सपोर्ट करेल. याशिवाय ही स्टीक डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉससाठीही सपोर्ट करेल.

  • स्टीकच्या रिमोटमध्ये Google असिस्टंटसाठी एक समर्पित बटण देण्यात आले आहे.

  • याशिवाय, इनबिल्ट ब्लूटूथ रिमोटवर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टारमध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष बटणंदेखील देण्यात आली आहेत.

टॅग्स :tv5G Smart Phone