Nissan ने भारतात डॅटसन ब्रँडचे उत्पादन थांबवले; जाणून घ्या कारण

nissan to discontinue datsun brands tops in india
nissan to discontinue datsun brands tops in india

निसानने भारतातील डॅटसन ब्रँडचे उत्पादन थांबविण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हा ब्रँड नऊ वर्षांपूर्वी भारतात लॉन्च केला होता. जपानी ऑटोमोबाईल कंपनी निसान (Nissan)ने भारतातील डॅटसन ब्रँड बंद करण्याची घोषणा केली आहे. एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, "डॅटसन रेडी-जीओ चे उत्पादन चेन्नई प्लांटमध्ये (रेनो निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) बंद झाले आहे. जोपर्यंत या मॉडेलचा स्टॉक शिल्लक आहे तोपर्यंत विक्री सुरू राहील. याआधी Nissan ने 2020 मध्ये रशिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिकेत हा ब्रँड बंद केला होता.

सेवा आणि वॉरंटी सुरूच राहतील

कंपनीने सांगितले की कार खरेदी करणारे आमचे सर्व सध्याचे आणि नवीन ग्राहकांना प्रथम प्राधान्य असेल. देशभरातील आमच्या सर्व डीलरशिप नेटवर्कवर सेवा उपलब्ध राहतील. आम्ही आमच्या कारवर मिळणाऱ्या वॉरंटी आणि मोफत सेवा देखील देत राहू. कंपनीने डॅटसन ब्रँडच्या इतर दोन मॉडेल्सचे उत्पादन आधीच बंद केले होते. कंपनीने पुढे सांगितले की, डॅटसन ब्रँड बंद करणे हा निसानच्या जागतिक परिवर्तन नितीचा एक भाग आहे, ज्याची घोषणा 2020 मध्ये करण्यात आली होती.

nissan to discontinue datsun brands tops in india
PM मोदी लाल किल्ल्यावरून करणार देशाला संबोधित; मोडणार जुनी परंपरा

Nissan च्या जागतिक परिवर्तन धोरणाचा एक भाग म्हणून, Nissan मुख्य मॉडेल्स आणि सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे जे ग्राहकांना, डीलर भागीदारांना आणि व्यवसायाला सर्वाधिक लाभ देतात. यामध्ये भारतातील 100,000 पेक्षा जास्त ग्राहकांच्या ऑर्डरसह स्थानिक पातळीवर उत्पादित निसान मॅग्नाइटचा समावेश आहे.

कंपनीच्या योजनेअंतर्गत निसानने सांगितले की ते रशियामधील डॅटसन व्यवसायातून बाहेर पडेल आणि ASEAN (असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स) क्षेत्रातील काही बाजारपेठांमधील कामकाज सुरळीत करेल. कंपनीने इंडोनेशियातील मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स थांबवण्याचीही घोषणा केली. जुलै 2013 मध्ये, जपानी ऑटो कंपनीने एंट्री-लेव्हल हॅचबॅक 'डॅटसन गो' भारतात लॉन्च केली होती. तसेच, डॅटसनला जागतिक स्तरावर पुन्हा लॉन्च करण्यात आले होते.

nissan to discontinue datsun brands tops in india
Netflix पाहाणे होणार आणखी स्वस्त; कंपनी घेऊन येतेय खास प्लॅन्स

ब्रँड अपेक्षेनुसार यशस्वी ठरला नाही..

पुढील वर्षी, डॅटसनने रेडी-जीओ आणि कॉम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी-पर्पज व्हेईकल) गो+ ही आणखी दोन मॉडेल्स लॉन्च केली. मात्र, मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या पुढे त्याची फारशी विक्री झाली नाही. निसान मोटार कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्लोस घोस्न यांनी भारतातील बाजारपेठेतील हिस्सा 2013 मधील 1.2 टक्क्यांवरून 2016 पर्यंत 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी डॅटसन कंपनीमध्ये मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जी पण ही अपेक्षा पुर्ण होऊ शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com