हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली कार लॉंच; काय आहे खास? वाचा

nitin gadkari launched indias first hydrogen based toyota mirai fuel cell electric vehicle fcev check details
nitin gadkari launched indias first hydrogen based toyota mirai fuel cell electric vehicle fcev check details

देशातील ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल (Hydrogen based Fuel Cell Electric car) वर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई (Toyota Mirai) बुधवारी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. ही कार अतिशय युनिर तंत्रज्ञानावर आधारित असून गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या ही स्पेशल कार एका चार्जमध्ये 600 किमी चालते. मिराई शब्दाचा जपानी भाषेत अर्थ भविष्य असा होतो त्यामुळे या गाडीला मिराई ते नाव देण्यात आले आहे.

टोयोटाने भारतातील पहिले हायड्रोजन इंधन सेलवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन Mirai लाँच केले असून, या टोयोटा मिराई मध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे आणि ही कार सिंगल चार्जमध्ये ही 600 किमी पर्यंत चालते. या कारमध्ये हायड्रोजनचे रुपांतर विजेमध्ये होते ज्यामुळे सेडानला शक्ती मिळते. तर यातून फक्त पाणी बाहेर टाकले जाते त्यामुळे ही कार पुर्णपणे पर्यावरण पूरक आहे. कारमध्ये ऑनबोर्ड वीज तयार होते, ज्यावर कार चालवली जाते. कारच्या मागील बाजूस 1.4 kWh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनापेक्षा 30 पट कमी आहे. एका सिलिंडरवर ही कार 650 किमी प्रवास करते. तर एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरला जातो.

सुरक्षेबद्द काय?

टोयोटा मिराईमध्ये तीन हायड्रोजन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. कारच्या आत सिलिंडर अशा प्रकारे ठेवले आहेत की सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. हे बुलेट प्रूफ सिलिंडर असून त्यामुळे याला कोणतेही धोका होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने कार पूर्णपणे सुरक्षित आहे. कारमध्ये सेन्सर बसवलेले आहेत जे कोणतीही अडचण आल्यास संपूर्ण सिस्टीम बंद करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com