Nokia ने लाँच केला ड्युअल डिस्प्ले फोन किंमत ५ हजार पेक्षाही कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nokia phone

Nokia ने लाँच केला ड्युअल डिस्प्ले फोन किंमत ५ हजार पेक्षाही कमी

तुम्ही नोकिया मोबाईलचे चाहते असाल तर तूमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नोकिया कंपनीने भारतात आपला Nokia 2660 Flip लाँच केला आहे. पाच हजार पेक्षा कमी किंमतीत हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा आहे.जून 2022 मध्ये Nokia 2660 Flip च्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली होती. काही निवडक बाजारात लाँच केल्यानंतर हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे.

नोकिया 2660 फ्लिपचे फीचर्स:

फोनमध्ये एक 2.8 इंचाचा तर दुसरा 1.77 इंचाचा सेकंडरी डिस्प्ले, Nokia 2660 Flip ची किंमत 4 हजार 699 रुपये, 48B रॅम आणि 128MB चे इंटरनल स्टोरेज,मायक्रो एसडी कार्ड, फोनची मेमरी 32 जीबी, 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश, 2.75 वॉटची रिमूव्हबेल बॅटरी

नोकिया 2660 फ्लिप फोन S30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

फोनमध्ये कंपनी एफएम रेडिओ आणि MP3 प्लेयर ऑफर करीत आहे. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ 4.2, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी 2.0 सारखे ऑप्शन देत आहे. हा फोन काळा,लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. तूम्ही Nokia 2660 Flip अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या साइटवरून खरेदी करू शकता.

टॅग्स :IndiaphoneNokia