Nokia G60 5G: लवकरच भारतात येतोय Nokia चा 5G फोन, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nokia g60 5g india launch confirmed know features and expected price

Nokia G60 5G: लवकरच भारतात येतोय Nokia चा 5G फोन, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

फिनिश कंपनी नोकिया लवकरच आपला नवीन 5G फोन Nokia G60 5G भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. ब्रँड लायसेंस धारक HMD Global ने कंफर्म केली की या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर लवकरच भारतात सुरू होतील. नवीन स्मार्टफोन कंपनीच्या भारत वेबसाइटवर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लीस्ट केला गेला आहे आणि लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल.

HMD Global कडून Nokia G60 5G चे सप्टेंबरमध्ये बर्लिन येथे IFA 2022 कार्यक्रमात सादर करण्यात आला होता. डिव्हाइसच्या लिस्टीगमध्ये कंन्फर्म करण्यात आले आहे की या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले व्यतिरिक्त Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि 4,500mAh बॅटरी दिली आहे. वॉटरड्रॉप स्टाइल नॉच व्यतिरिक्त, फोनच्या मागील पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसेल.

नोकियाने ट्विटमध्ये कंफर्म केले आहे की नोकिया जी60 ची प्री-बुकिंग लवकरच सुरू होईल. कंपनीने सांगितले आहे की या फोनवर अनेक इंडिया एक्सक्लूसिव्ह ऑफर्स देखील उपलब्ध असतील. मात्र, भारतीय बाजारात या फोनच्या किंमतीबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. ब्लॅक आणि आइस कलर पर्यायांसह, हा जागतिक बाजारपेठेत 349 युरो (सुमारे 28,000 रुपये) किंमतीला लॉन्च केला गेला आहे. भारतातही त्याची किंमत 25,000 रुपयांच्या जवळपास असू शकते.

हेही वाचा: Car Tyre : आता गाडीत हवा भरायची गरजचं नाही; आले खास टायर

Nokia G60 5G चे स्पेसिफिकेशन्स कसे आहेत?

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Nokia G60 5G मध्ये फुल एचडी + (1080x2400 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा डिस्प्ले आहे. 500 nits च्या पिक ब्राइटनेससह डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येतो. 5G फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, मागील पॅनलवरील 50MP प्राथमिक कॅमेरा व्यतिरिक्त, फोनमध्ये 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसचे मोठ्या 4,500mAh देखील फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. डिव्हाइसमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनसाठी सेन्सर उपलब्ध आहे.

हेही वाचा: Blue Tick on Instagram: तुम्हालाही इंस्टाग्रामवर 'ब्लू टीक' हवीय? जाणून घ्या सोपी व्हेरिफिकेशन प्रोसेस

टॅग्स :Technology