Nokia T21 Tablet Launched : खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाला नोकियाचा टॅबलेट; काय आहे खास?

nokia t21 tablet launched in india starting rupees 17999 price check specifications features
nokia t21 tablet launched in india starting rupees 17999 price check specifications features

Nokia T21 Tablet Price : नोकियाने आपला नवीन टॅबलेट Nokia T21 भारतात लॉन्च केला आहे. Nokia T21 टॅबलेट पहिल्यांदा सप्टेंबर 2022 मध्ये सादर करण्यात आला होता. या टॅबलेटमध्ये 10.36 इंच 2K LCD स्क्रीन दिली आहे.

नोकियाच्या टॅबलेटमध्ये 4 जीबी रॅमसह 2 वर्षांची ओएस आणि 3 वर्षांची सुरक्षा अपडेट मिळतील. नवीन नोकिया टॅबलेट नॉर्डिक डिझाइन, सँडब्लास्टेड अॅल्युमिनियम बॉडी, IP52 आणि डस्ट आणि स्प्लॅश प्रतिरोधक यांसारख्या फीचर्ससह येतो. नवीन Nokia T21 टॅबलेटच्या किंमती आणि फीचर्सबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात..

नोकियाच्या या टॅबलेटला रेडमी पॅड, रियलमी पॅड आणि ओप्पो पॅड एअरकडून टक्कर मिळेल. भारतात रेडमी पॅडची किंमत रु. 14,999 पासून सुरू होते. Oppo Pad Air हा 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि Realme Pad हा 11,999 रुपयांच्या किमतीत विकत घेता येईल.

nokia t21 tablet launched in india starting rupees 17999 price check specifications features
Viral News : रस्ता खराब; चुक कबूल करत मंत्र्यांने धुतले चिखलाने भरलेले पाय अन्…

नोकिया टी21 ची भारतात किंमत

नोकिया टी21 टॅबलेटच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. हे चारकोल ग्रे रंगात खरेदी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी एलटीई + वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. टॅबलेटची प्री-बुकिंग 17 जानेवारीपासून Nokia.com वर सुरू होईल आणि 22 जानेवारीपासून रिटेल स्टोअर्स, भागीदार वेबसाइट्स आणि प्रमुख आउटलेटवर विक्री सुरू होईल.

nokia t21 tablet launched in india starting rupees 17999 price check specifications features
Maharashtra Politics : निलेश राणे Vs संजय राऊत; आजी-माजी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ!

नोकिया टी21 लॉन्च ऑफर

Nokia T21 टॅबलेटची प्री-बुकिंग केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, कंपनीला 1,999 रुपयांचे फ्लिप कव्हर मोफत मिळेल.

नोकिया T21 चे फीचर्स

Nokia T21 मध्ये 10.36 इंच (2000 x 1200 pixels) IPS LCD स्क्रीन आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 5:3 आहे. या टॅब्लेटमध्ये संरक्षणासाठी मजबूत काच उपलब्ध आहे. स्मार्टफोन 1.82GHz UNISOC T612 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे जो 12nm प्रोसेसवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी स्मार्टफोनमध्ये Mali-G57 GPU देण्यात आला आहे.

नोकिया टी21 टॅबलेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. नोकियाचा हा टॅबलेट नॅनो सिम कार्डला सपोर्ट करतो. या डिवाइस मध्ये Android 12 सपोर्ट देण्यात आला आहे.

टॅबला पॉवर देण्यासाठी नोकियाने 8200mAh बॅटरी दिली आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. पण नोकियाने बॉक्समध्ये 10W चा चार्जर दिला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या टॅबलेटची बॅटरी 3 दिवसांपर्यंत टिकेल. हा टॅबलेट वाय-फाय आणि एलटीई व्हर्जनमध्ये येतो. या टॅबलेटमध्ये व्हॉईस कॉलिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

nokia t21 tablet launched in india starting rupees 17999 price check specifications features
G20 in Pune Viral Memes : तर मग झेड ब्रीजचं सुशोभिकरण का नाही? जी-२० वरुन पुणेकरांचे टोमणे

Nokia T21 टॅबलेटमध्ये LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या टॅबलेटमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.3.5 एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, स्टिरिओ स्पीकर, ड्युअल मायक्रोफोन, ओझेओ ऑडिओ आणि प्लेबॅक सारखे फीचर्स या डिव्हाइसमध्ये देण्यात आले आहेत. हा टॅबलेट धूळ आणि पाणी प्रतिरोधक (IP52) रेटिंगसह येतो.

नोकिया टॅबचे डायमेंशन्स 247.5 x 157.3 x 7.5 मिलीमीटर आहेत आणि वजन सुमारे 466.2 ग्रॅम आहे. या Nokia डिवाइस मध्ये कनेक्टिव्हिटी साठी 4G LTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.0, GPS, GLONASS, USB Type-C आणि NFC सारखे फीचर्स व्हॉईस कॉलिंग सोबत देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com