न हरवणारी छत्री

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

सोबत घेतलेली छत्री बस, ट्रेनमध्ये विसरल्याने होणारे आर्थिक नुकसान व गैरसोयीचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांनी घेतलाच असेल. मात्र आता या त्रासातून सुटका होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. क्रोएशिया येथील गोरान कॅंड्रिलिक यांनी न हरवणारी छत्री शोधली आहे."क्रिशा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या छत्रीचा माग काढता येतो, तसेच ही छत्री तुम्हाला हवामानाच्या ताज्या घडामोडी आणि अचूक अंदाजदेखील देते. या छत्रीमध्ये ब्लू टूथ चीप आणि हॅंडलवर एक दिवा बसविण्यात आला आहे. स्मार्ट फोनमधील पसोबत ही छत्री जोडता येते. छत्री वि सरून दूर जाऊ लागताच छत्री वि सरल्या चा अलार्म आपल्या फोनवर येतो आणि नकाशावरून ति चा मागदेखील काढता येतो.

ही छत्री पुढच्या पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तवून तुम्ही छत्री सोबत बाळगायला हवी की नको, हेही सांगते. या छत्रीला तीन वर्षांची वॉरंटी आहे. याबाबत बोलताना गोरान म्हणाले,"

"आम्हाला चांगल्या दर्जाची, टिकाऊ छत्री बनवायची होती. म्हणूनच जोराच्या वाऱ्यातही तग धरणारी आणि हवामानाचा अंदाज देणारी ही छत्री आम्ही विकसित केली. यात आणखी सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.''
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not lacking umbrella