
विजय देऊळगावकर
आता दुचाकी चालवणाऱ्यासह त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट धारण करावे लागणार आहे. राज्याच्या वाहतूक शाखेचे अपर पोलिस महासंचालक अरविंद साळवे यांनी नुकताच या बाबत आदेश काढला. राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना याबाबत कडक कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.