Nothing Phone 2
Nothing Phone 2eSakal

Nothing Phone 2 : नथिंग कंपनीचं ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट! 'फोन-2'च्या किंमतीत मोठी सूट..

थिंगच्या फोन 2 या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 44,999 रुपये आहे. मात्र यावर आता मोठी सूट मिळत आहे.
Published on

Nothing Christmas Offer : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Nothing Phone 2 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण नथिंग कंपनी नाताळच्या निमित्ताने आपल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहे. आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरुन पोस्ट करत नथिंग इंडियाने याबाबत माहिती दिली.

या ऑफरमध्ये तुम्ही नथिंग फोन 2 हा स्मार्टफोन कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकता. यावर फ्लिपकार्ट, विजय सेल्स आणि क्रोमा मध्ये विविध प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. यांपैकी कुठे सगळ्यात जास्त डिस्काउंट मिळत आहे हे आपण पाहणार आहोत. नथिंगच्या फोन 2 या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 44,999 रुपये आहे.

विजय सेल्स अन् क्रोमा

विजय सेल्स आणि क्रोमा स्टोअरमध्ये तसंच ऑनलाईन वेबसाईटवर नथिंग फोन 2 चा 12GB+256GB व्हेरियंट केवळ 37,999 रुपयांना उपलब्ध आहे. 12GB+512GB व्हेरियंट (व्हाईट) हा 40,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर याच व्हेरियंटमधील डार्क ग्रे रंगाचा फोन 42,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Nothing Phone 2
Car Offers : अजूनही गेली नाही कार घेण्याची संधी; 'ही' मोठी कंपनी देतेय 2 लाखांपर्यंतची सूट! काय आहेत ऑफर्स?

फ्लिपकार्टवर कार्ड ऑफर्स

फ्लिपकार्टवर 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 41,999 रुपये आहे. तर, 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 49,999 रुपयांऐवजी 44,999 एवढी आहे. नथिंग फोन 2 यावर 6,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com