google photos
google photos

आता Google Photos वरील डिलीट केलेले फोटोज करा Restore; जाणून घ्या काही स्टेप्स

नागपूर : बरेचदा आपण आपल्या मोबाईलमध्ये अनेक फोटो काढतो. मात्र यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये पुरेशी स्पेस नसते. म्हणून आपण हे फोटो Google Photos मध्ये सेव्ह करतो. मात्र Google फोटो वापरल्यास आणि आपण चुकून गुगल फोटोमध्ये फोटो डिलीट केले असतील तर टेन्शन घेऊ नका. येथे आम्ही आपल्याला काही स्टेप्स सांगत आहोत जेणेकरुन आपण ते परत मिळवू शकाल.

google photos
मोठी बातमी! आता विदर्भातच तयार होणार रेमडेसिव्हिर; गंभीर रुग्णांवर वेळेत होणार उपचार

Android फोनमध्ये असे restore करा फोटो

सुरुवातीला आपल्या Android स्मार्टफोनमध्ये Google फोटो ओपन करा. वरच्या डावीकडील हॅमबर्गर चिन्हावर टॅप करा आणि Trash निवडा. आपण पुन्हा सेव्ह करू इच्छित असणाऱ्या फोटो दीर्घकाळ प्रेस करून ठेवा. पूर्ण झाल्यानंतर रिस्टोर करा. आपण पुन्हा लायब्ररीत गेल्यावर पुन्हा हटवलेले फोटो तुम्हाला दिसतील.

iPhone मध्ये असे restore करा फोटो

यासाठी, आयओएस डिव्हाइसमध्ये गूगल फोटो उघडा, त्यानंतर डावीकडे वरच्या हॅम्बर्गर चिन्हावर टॅप करा आणि बिन निवडा. मग वरच्या डावीकडील होरिजोंटल थ्री डॉट आइकन टॅप करा आणि सिलेक्ट वर टॅप करा. कार्य पूर्ण झाल्यानंतर फोटो निवडा आणि restore करा. जेव्हा आपण पुन्हा पहाल, तेव्हा आपल्याला हटविलेले फोटो पुन्हा लायब्ररीत सापडतील.

google photos
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

डेस्कटॉपवर असे restore करा फोटो

यासाठी, आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपवरील ब्राउझरमधील https://photos.google.com/ लिंकवर जा आणि वेबवर Google फोटो उघडा. या प्रक्रियेसाठी प्रथम आपल्या Google ID सह लॉगिन करा. होम पेजवर जा आणि वरच्या डाव्या कोपऱ्यात जा आणि हॅम्बर्गर चिन्हावर क्लिक करा आणि ट्रॅश निवडा.

आपण restore करू इच्छित फोटो निवडा. पूर्ण झाल्यानंतर वरच्या उजवीकडे असलेल्या restore बटणावर क्लिक करा, ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आपण फोटो लायब्ररीत गेल्यावर पुन्हा हटविलेले फोटो आपल्याला दिसतील.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com