...आता व्हॉट्सऍपवरही करा मित्रांना 'टॅग'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली- ग्रुप चॅटींगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपने चॅटींगदरम्यान ‘टॅग‘ (@) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या ऍण्ड्रॉइड व आयओएस मोबाइल धारकांना याचा लाभ घेताना येणार आहे. सध्यातरी डेस्कटॉपवर (व्हॉट्सअॅप वेब) ही सुविधा उपलब्ध नाही.

सोशल नेटवर्किंगसाइटवरील फेसबुक व ट्विटरवर यापूर्वी ‘@‘ बटणाचा वापर करता येत होता. व्हॉट्सऍपनेही ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे नेटिझन्सला याचा फायदा होणार आहे. या नव्या फीचरनुसार एखाद्या ग्रुपमध्ये चॅटिंग करत असताना कीपॅडवरील ‘@‘ हे बटण वापरल्यास ग्रुपवरील सर्व सदस्यांची नावे (contacts) एकाच वेळी दिसू शकतील. त्यामुळे फेसबूक वा ट्विटरप्रमाणे व्हॉट्सऍपवरही मित्रांना टॅग करून शकता. परंतु, या फीचरचा लाभ घेण्यासाठी व्हॉटसऍप अपडेट करावे लागणार आहे. विशेष म्हणजे ग्रुपमध्ये असलेल्या मात्र तुम्ही नंबर सेव्ह न केलेल्यांनाही टॅग करता येणार आहे. टॅग केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव हायपरलिंकमध्ये येईल. अर्थात त्यावर क्लिक केले की त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर जाऊ शकाल. 
 
दरम्यान, व्हॉट्सऍप नेटिझन्सची गरज ओळखून नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत आहे. यापूर्वीही विशिष्ट मेसेजला रिप्लाय देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. त्याचप्रमाणे फोटो एडिटिंग व मजकरू वाचणारे (स्पिक) नवीन फीचर्स लवकरच उपलब्ध होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now tag your friends on WhatsApp