आता नोंदणीकृत मोबाइल नंबरशिवाय डाउनलोड कोरू शकता आधार; जाणून घ्या सोपा मार्ग

आता तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवायही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
Aadhar Card
Aadhar CardEsakal

Aadhaar Card: आधार कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवायही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. आधार जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) ही घोषणा केली आहे.

विशेषत: ज्यांनी आपला मोबाईल नंबर (Mobile Number) नोंदविला नाही अशा लोकांना मदत करण्यासाठी UIDAI ने हे पाऊल उचलले आहे. पूर्वीच्या वापरकर्त्यांना आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधारशी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक होता. चला मग मोबाईल नंबरशिवाय तुम्ही आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता ते आपण पाहणार आहोत. (Now you can download your Aadhar card even without a registered mobile number.)

Aadhar Card
बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, पालकांची चिंता मिटली!

आधार डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या-

1. यासाठी तुम्ही प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'My Aadhaar' वर टॅप करा.

2. आता 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' वर क्लिक करा.

3. आता तुम्हाला येथे 12 अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल.

4. येथे तुम्ही आधार क्रमांकाऐवजी 16 अंकी वर्चुअल आइडेंटिफिकेशन नंबर (VID) देखील टाकू शकता.

5. या प्रक्रियेनंतर, तुम्हाला दिलेला सुरक्षा किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

6. जर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर 'मेरा मोबाइल नंबर पंजीकृत नहीं है' (My mobile number not registered) या पर्यायावर क्लिक करा.

7. आता तुमचा पर्यायी क्रमांक किंवा नोंदणी नसलेला मोबाईल क्रमांक टाका.

Aadhar Card
बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, पालकांची चिंता मिटली!

8. आता 'Send OTP' वर क्लिक करा.

9. आता तुम्ही एंटर केलेल्या पर्यायी क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.

10. पुढे, तुम्ही 'अटी आणि नियम' चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नंतर 'सबमिट' वर क्लिक करा.

11. आता तुमच्यासमोर नवीन पृष्ठ ओपन होईल.

12. रीप्रिंटिंग पडताळणीसाठी तुम्हाला येथे आधार कार्डचे प्रीव्ह्यू करण्याचा पर्याय मिळेल.

13. यानंतर तुम्ही 'Make Payment' हा पर्याय निवडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com