कोरोनामुळे घरीच आहात? मग तुमच्यासाठी आहे खास!

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

- घरात बसून कंटाळा आला असेल तर ऍमेझॉनने आणलंय तुमच्यासाठी काहीतरी खास. 

मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना पुढील २१ दिवस घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोट्यवधी लोक घरातच आहेत. अशावेळी घरात बसून कंटाळा आला असेल तर ऍमेझॉनने आणलंय तुमच्यासाठी काहीतरी खास. 

पंतप्रधान मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणे हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी सांगितले. त्यानुसार अनेक लोक सध्या घरीच आहेत. मात्र, त्यांच्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राईम फ्री मूव्ही घेऊन आला आहे. त्यानुसार, चित्रपटांसह आपल्या आवडत्या मालिकांचे जुने भागही पाहता येणार आहेत. 

ऍमेझॉन प्राईमकडून त्यांच्या यूजर्सला एक महिन्यांसाठी फ्री सर्व्हिस दिली जाते. त्यानंतर यूजरला चित्रपट आणि मालिका पाहण्यासाठी पैसे भरावे लागतात .पण आता अ‍ॅमेझॉनने काही बदल करून घेतले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइममध्ये चित्रपट पाहण्यासाठी आता यूजर्सला मेंबरशीप घेण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी लागेल तुमचं ऍमेझॉन अकाउंट. त्यानंतर तुम्ही ते फ्री असलेले चित्रपट आणि मालिका पाहू शकता.

मुलांसाठी कार्टुनची सोय

लहान मुलांसाठी वेगळा भाग आहे तर मोठ्यांसाठी वेगळा भाग. त्यानुसार, लहान मुलांच्या भागात अनेक अ‍नलिमिटेड , कार्टून फिल्म्स आहेत. अ‍ॅमेझान प्राइम हा सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now You Can Watch Free Movies On Amazon Prime Video