बंदिस्त कार्यालय आरोग्यास घातक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

दररोज स्वच्छ, मोकळ्या हवेत फिरल्यास कार्यालयातील बंदिस्त वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा तुमचा समज असल्यास तो चुकीचा आहे. कार्यालयातील बंदिस्त वातावरण आरोग्यास हानिकारक ठरू शकते, असा दावा एका नव्या संशोधनात केला आहे.

दररोज स्वच्छ, मोकळ्या हवेत फिरल्यास कार्यालयातील बंदिस्त वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा तुमचा समज असल्यास तो चुकीचा आहे. कार्यालयातील बंदिस्त वातावरण आरोग्यास हानिकारक ठरू शकते, असा दावा एका नव्या संशोधनात केला आहे.

कार्यालयासारख्या बंदिस्त ठिकाणी कार्बन डाय-ऑक्‍साईड (CO2) वायूचे प्रमाण आरोग्यास नुकसान पोचण्याइतके वाढू शकते, असे संशोधकांचे मत आहे. अमेरिकेतील हार्वर्ड आणि सिरैक्‍युज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले असून, त्याचे निष्कर्ष"एन्व्हॉयर्नमेंटल हेल्थ प्रसपेक्‍टिव्हस' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. संशोधकांनी 24 स्वयंसेवकांची तीन वेगवेगळ्या कार्यालयीन वातावरणांत चाचणी घेतली.

या वेळी या तीन कार्यालयांतील कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण 550पीपीएम, 945 पीपीएम आणि 1400पीपीएम नोंदवले गेले. संशोधकांनी सहभागींची दिवसअखेर चाचणीही घेतली. त्यावेळी 945 पीपीएम प्रमाण असणाऱ्या कार्यालयात काम करणाऱ्यांचे गुण 550पीपीएम प्रमाण असणाऱ्यांपेक्षा 15 टक्के कमी झाले. त्याचप्रमाणे कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या 1400 पीपीएम पातळीत काम करणाऱ्यांचे गुण 550 पीपीएमपेक्षा 50 टक्‍क्‍यांनी कमी भरले. केवळ कार्यालयातील व्हेंटिलेशन किंवा किती खिडक्‍या उघड्या आहेत यावर कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण अवंलबून नाही.आपल्या उच्छ्वासातून कार्बन डाय-ऑक्‍साईड बाहेर पडत असल्याने आतमधील लोकांच्या संख्येवरही ते अवलंबून आहे, असे संशोधकांचे मत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Office closed health risks

टॅग्स