Ola Scooterची टेस्ट राईड सुरु, फक्त 'या' शहरांमध्ये उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Scooter
Ola Scooterची टेस्ट राईड सुरु, फक्त 'या' शहरांमध्ये उपलब्ध

Ola Scooterची टेस्ट राईड सुरु, फक्त 'या' शहरांमध्ये उपलब्ध

Ola Scooter बुक करणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. मात्र ती भारतातील काही शहरांतील लोकांपुरतीच मर्यादित असेल. कंपनीच्या संकेतस्थळानुसार ओला स्कूटरची टेस्ट राईड बुधवारपासून (ता.दहा) सुरु होत आहे. लोक या टेस्ट राईडसाठी बुकिंग करु शकतात. कंपनीने यासाठी काही निवडक शहरात 'Ols Test Ride Camp' लावले आहेत. जाणून घ्या पूर्ण तपशील...

ओला स्कूटर बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकने म्हटले आहे, की ओला स्कूटरची टेस्ट राईडची संधी अशाच लोकांना मिळेल, ज्यांनी ओला एस १ आणि ओला एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आगाऊ नोंदणी केली आहे. कंपनीने १० नोव्हेंबरपासून केवळ दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि बंगळूरु या शहरांतच ओला स्कूटरची टेस्ट राईड सुरु केली आहे. मात्र कंपनीचे म्हणणे आहे की पुढील काही आठवड्यांमध्ये ही टेस्ट राईड देशभरातील शहरांमध्ये सुरु केली जाईल.

हेही वाचा: झिरो डाऊन पेमेंटवर ३.२ लाखांत खरेदी करा Hyundai i10 Asta

दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशमध्ये (एनसीआर) जर कोणाला ओला स्कूटरची टेस्ट राईड घ्यायची असेल तर त्यांना गुरुग्रामच्या सायबर सिटी येथील फोरम (We Work)जावे लागेल. दुसरीकडे कोलकात्यामध्ये साऊथ सिटी माॅल, अहमदाबादमध्ये हिमालया माॅल आणि बंगळूरुत प्रेस्टिज क्यूब लस्करवर टेस्ट राईड कॅप लावण्यात आले आहेत. ओलाने ओला स्कूटरची अंतिम पेमेंटची सुविधा बुधवारपासून सुरु केली आहे. ज्यांनी ओला एस१ आणि ओला एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग पूर्वी केली होती. यासाठी त्यांना नोटिफिकेशन पाठविण्यात आले आहेत. ते ओला स्कूटरचे पेमेंट करु शकतात. अगोदर ओला स्कूटरचे दुसऱ्या लाॅटची परचेजिंग विंडो नोव्हेंबरमध्ये सुरु होणार होते. मात्र आता कंपनीने ती पुढे ढकलले आहे. आता हे १६ डिसेंबर रोजी सुरु होईल. ओला स्कूटरची लाँचिंग या वर्षी १५ ऑगस्ट रोजी झाली होती. कंपनीने ओला स्कूटरचे २ माॅडल्स बाजारात आणले आहेत. यात ओला एस १ ची एक्स शोरुम किंमत ९९ हजार ९९९ रुपये आणि 'ओला एस १ प्रो'ची किंमत १ लाख २९ हजार ९९९ रुपये आहे.

loading image
go to top