Ola S1 Pro महागणार! आजच बूक करा तुमची Gerua स्कूटर | Holi Special Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Electric to raise e-scooter prices in next purchase window

Ola S1 Pro महागणार! आजच बूक करा तुमची Gerua स्कूटर

महगाईच्या काळात स्कूटर (Scooter) चालवणे आता महाग झाले आहे. ओला एस 1 प्रोच्या (Ola S1 Pro) किंमतीमध्ये लवकरच वाढ होणार आहे. आता तिची किंमत 129,999 लाख रुपये आहे. बंगळूर येथील मोबिलिटी फर्मने दिलेल्या माहितनुसार, १८ मार्चनंतर स्कूटरच्या किंमतीमध्ये वाढ होईल. (Ola Electric to raise e-scooter prices in next purchase window)

Ola Electric ने पुढील विंडो खरेदीमध्ये S1 Pro ई-स्कूटर्सच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) के सीईओ भाविश अग्रवाल यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे की, ग्राहकांना ही स्कूटर अॅपद्वारे खरेदी करावी लागेल.

एप्रिलमध्ये डिस्पॅच होईल नवीन ऑर्डर

Ola ने होळीच्या मुहूर्तावर गेरुआ( OCHER) रंगात Ola S1 Pro लॉन्च केला आहे. पण गेरूआ रंगाची Ola S1 Pro फक्त 18 मार्च रोजी म्हणजे आजच खरेदी करता येईल. कंपनीने सांगितले की,'' Ola S1 Pro च्या नवीन ऑर्डरची डिस्पॅच एप्रिल 2022 पासून सुरू होईल, जी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाईल. कंपनीने आपल्या स्कूटरसाठी नवीन अपडेट्सही जाहीर केले आहेत. हे अपडेट त्याचे परफॉरमेंस सुधारेल आणि MoveOS 2.0 अपडेटसह नवीन वैशिष्ट्ये जोडेल.

पूर्ण चार्ज झाल्यावर 181 किलोमीटर धावते

कंपनीने Ola S1 Pro स्कूटरमध्ये 8.5kW ची बॅटरी दिली आहे. यात नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर असे तीन रायडिंग मोड आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास आहे. ते फक्त 3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवते. कंपनीचा दावा आहे की,''ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 181 किलोमीटर (एआरएआय प्रमाणित) पर्यंतची रेंज देऊ शकते.''

स्कूटरमध्ये ही वैशिष्ट्ये आहेत

वैशिष्ट्यांच्या बाबतीत, S1 Pro मध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, टेक मी होम लाईट्स तसेच रिमोट स्टार्ट/स्टॉप आणि लॉक/अनलॉक यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने स्कूटरच्या दोन्ही चाकांमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. स्कूटरमध्ये 36-लिटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस आहे, ज्यामध्ये दोन ओपन-फेस हेल्मेट आरामात ठेवू शकतात.

टॅग्स :Ola Electric Scooter