Omegle Shut Down : प्रसिद्ध चॅटिंग प्लॅटफॉर्म 'ओमेग्ले' अचानक बंद; यूजर्सना मोठा धक्का! काय आहे कारण?

Omegle Website : लेईफ के-ब्रूक्स याने 2009 साली या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती.
Omegle Shut Down
Omegle Shut DowneSakal

जगप्रसिद्ध चॅटिंग प्लॅटफॉर्म ओमेग्लेने अचानक आपली सेवा बंद केली आहे. हा प्लॅटफॉर्म चालवणं आता आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला शक्य नसल्याचं ओमेग्लेच्या फाऊंडरने स्पष्ट केलं आहे. लेईफ के-ब्रूक्स याने 2009 साली या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. यानंतर बुधवारी (8 नोव्हेंबर) अचानकपणे ही वेबसाईट बंद करण्यात आली.

"मी 18 वर्षांचा असताना ओमेग्ले लाँच केलं होतं. तेव्हा मी माझ्या आई-वडिलांसोबतच राहत होतो. इंटरनेटमुळे जग एक 'ग्लोबल व्हिलेज' झाल्याचं आपण म्हणतो. एखाद्या गावातून फिरताना जसे आपल्याला अचानक लोक भेटतात, त्याचप्रमाणे या ग्लोबल व्हिलेजमध्ये फिरताना इतरांना भेटण्यासाठ ओमेग्ले काम करत होतं." असं लेईफ म्हणाले.

"दुर्दैवाने, चांगल्या गोष्टी कायम टिकत नाहीत. ओमेग्लेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला लढा देणं आणि सोबत प्लॅटफॉर्म चालवणं याचा ताण खूपच आहे. हे मला आता मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या शक्य नाहीये. याचा परिणाम माझ्या आरोग्यावर देखील होत आहे, आणि मला वयाच्या तिसाव्या वर्षी हार्ट अटॅक नको आहे." असंही ते म्हणाले. (Tech News)

यूजर्सच्या विविध प्रतिक्रिया

या घोषणेनंतर ओमेग्ले यूजर्सनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं आहे. हा एका पर्वाचा अंत असल्याचं यूजर्स म्हणत आहेत, तर काही यूजर्स "RIP Omegle" अशा कमेंट्स देखील करत आहेत.

ओमेग्लेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं गेल्या काही वर्षांमध्ये दिसत होतं. यावर देखील कित्येक इंटरनेट यूजर्सनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा प्लॅटफॉर्म बंद झाल्यामुळे आता याचा गैरवापर करणारे वैतागले असतील अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com