OnePlus घेऊन येतोय धमाकेदार स्मार्टफोन, डिझाइन बघून लगेच घ्यायची इच्छा होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus Feature

OnePlus घेऊन येतोय धमाकेदार स्मार्टफोन, डिझाइन बघून लगेच घ्यायची इच्छा होईल

OnePlus त्याचे बरेच प्रोडक्ट 7 फेब्रुवारीला लाँच करणार आहे. ज्यामध्ये OnePlus 11 5G, OnePlus Buds Pro 2 TWS earbuds, OnePlus TV 65 Q2 Pro आणि OnePlus Pad टॅबलेटचा समावेश आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की OnePlus 11R 5G चे चीनमध्ये OnePlus Ace 2 म्हणून रिब्रँड केले जाईल. कंपनीने घोषणा केली आहे की ती 7 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये Ace 2 लॉन्च करेल. चला जाणून घेऊया OnePlus Ace 2 चे फीचर्स.

OnePlus Ace 2 चे जबरदस्त डिझाइन

OnePlus Ace 2 चे काही फोटोज समोर आले आहेत. हा फोन कर्व एजसह पंच होल आणि डिस्प्लेसह येतो.यात राइड एजवर एक अलर्ट स्लायडर आणि एक पावर बटन असेल. तर डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर मिळेल.

OnePlus Ace 2 ला 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आणि 1.5K रिझोल्यूशन असेल. फोन Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेटद्वारे डेडिकेटेड असेल. फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. हा फोन Android 13 OS वर चालेल. (Technology)

OnePlus Ace 2 कॅमेरा

OnePlus Ace 2 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 50MP प्राथमिक लेन्स, 12 किंवा 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मायक्रो लेन्स उपलब्ध असतील. त्याच वेळी, समोर 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळेल.

टॅग्स :Designs5G Smart Phone