OnePlus 10 Pro लॉंचची तारीख कंफर्म; कंपनीच्या CEO ने केला खुलासा

OnePlus 10 Pro
OnePlus 10 Pro

OnePlus 10 Pro launch date : OnePlus ही स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांच्या OnePlus 10 सीरीजमधील पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. OnePlus कंपनीचे CEO Pete Lau यांनी त्यांच्या अधिकृत Weibo अकाउंटवरुन या स्मार्टफोनच्या लॉंचची तारीख कंन्फर्म केली आहे. त्यांनी सांगितले की, OnePlus 10 Pro हा स्मार्टफोन येत्या जानेवारीमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

हा फ्लॅगशिप फोन अनेक दिवसांपासून चर्चेत आहे, यामध्ये ग्राहकांना Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल, OnePlus 10 Pro सोबत कंपनी OnePlus 10 फोन देखील लॉन्च करेल असे देखील बोलले जात आहे. OnePlus 10 सीरीजमधील या दोन्ही फोनमध्ये काही बाबतीत फरक असणार आहे, हे दोन्ही फोन वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध असतील.

OnePlus CEO Pete Lau ने चीनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट Weibo वर जाहीर केले की OnePlus 10 Pro फोन हा जानेवारीमध्ये लॉन्च केला जाईल. मात्र अद्याप त्यांनी नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान OnePlus बद्दल, असे म्हटले जात आहे की कंपनी 5 जानेवारी रोजी लास वेगासमध्ये CES 2022 इव्हेटचे फीजीकल इव्हेंट आयोजित करणार आहे, ज्यामध्ये OnePlus 10 आणि OnePlus 10 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरने दिले जाऊ शकतात, जे नुकतेच Qualcomm ने लॉन्च केले होते.

तसेच OnePlus 10 Pro फोन चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर 2022 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक स्तरावर आणि भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.

OnePlus 10 Pro
एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

OnePlus 10 Pro अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10 Pro मध्ये एक मोठा स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल दिले जाऊ शकते, ज्याबद्दल अलीकडेच लीक झालेल्या केस रेंडरमध्ये माहिती उघड झाली आहे. फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल अशी देखील आपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनला 6.7-इंचाचा (1440x3216 पिक्सेल) QHD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. स्मार्टफोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB इंटरनल UFS 3.1 स्टोरेजसह येऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाण्याची अपेक्षा आहे. तसेच फोन IP68 रेटिंगसह येऊ शकतो, ज्यामुळे तो डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट असेल.

OnePlus 10 Pro
30 हजारांत मिळणारे टॉप स्मार्टफोन्स; पाहा काय आहेत किंमती-फिचर्स?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com