OnePlus 11 5G : वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनची विक्री सुरू; कमी किमतीत करा खरेदी, जाणून घ्या ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus 11 5G : वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनची विक्री सुरू; कमी किमतीत करा खरेदी, जाणून घ्या ऑफर

OnePlus 11 5G : वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनची विक्री सुरू; कमी किमतीत करा खरेदी, जाणून घ्या ऑफर

वनप्लसचा सर्वात शक्तिशाली आणि फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5Gआज पहिल्यांदाच भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या क्लाउड 11 इव्हेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. OnePlus 11 5G सोबत, कंपनीने OnePlus Buds Pro 2 आणि OnePlus pad, OnePlus 11R आणि OnePlus स्मार्ट टीव्ही देखील लॉन्च केले आहेत.

हा फोन Amazon India वरून खरेदी करता येईल. हा फोन टायटन ब्लॅक आणि इंटर्नल ग्रीन कलर पर्यायांमध्ये येतो आणि त्याची किंमत 56,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर बँक ऑफर आणि कॅशबॅक देखील उपलब्ध आहेत.

OnePlus 11 5G वर ऑफर

हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो, त्याची 8GB RAM सह 128GB स्टोरेजची किंमत 56,999 रुपये आहे आणि 16GB RAM सह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 61,999 रुपये आहे. Amazon India वर फोनच्या खरेदीवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, EMI किंवा NetBanking वर रु. 1,000 ची सूट उपलब्ध आहे. यासोबतच फोनच्या खरेदीवर विविध बँकांमध्ये ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत.

OnePlus 11 5G चे स्पेसिफिकेशन

OnePlus 11 5G 6.7-इंच 2K रिझोल्यूशन AMOLED डिस्प्लेसह सादर करण्यात आला होता, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. OxygenOS 13 फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि Android 13 सह उपलब्ध आहे. कंपनी फोनसोबत चार वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेटही देणार आहे. म्हणजेच, Android 16 आणि Android 17 देखील फोनसोबत उपलब्ध असतील. फोनमध्ये 16 GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 256 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे.

OnePlus च्या लेटेस्ट फोनला Hasselblad ब्रँडिंगसह ट्रिपल रिअर कॅमेरे मिळतात. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेल सोनी IMX890 सेन्सर, 32-मेगापिक्सेल सोनी IMX709 टेलीफोटो पोर्ट्रेट लेन्ससह दुसरी लेन्स आणि 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल Sony IMX581sens सह तिसरी लेन्स दिली आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन भारतात 5,000 mAh बॅटरी आणि 100 वॉट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की फोन 25 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो.

टॅग्स :OnePlus