OnePlus 11 5G : 16GB रॅमसह लाँच होणार वनप्लसचा फ्लॅगशिप फोन; जाणून घ्या किंमत-फीचर्स

oneplus 11 5g set to launch on 7 february check price specifications leak ahead of launch 2023
oneplus 11 5g set to launch on 7 february check price specifications leak ahead of launch 2023 google

या वर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंट क्लाउड 11 (OnePlus Cloud 11 Event) मध्ये OnePlus आपला नवीन फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5G लॉन्च करणार आहे. हा कार्यक्रम 7 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, लॉन्चपूर्वी फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबाबत माहिती समोर आली आहे.

असे बोलले जात आहे की हा फोन 16 GB रॅम सह लॉन्च केला जाईल. यासोबतच कंपनी या फोनसोबत पाच वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्सही देईल. असे झाल्यास हा OnePlus चा पहिला फोन असेल, ज्यामध्ये Android 17 अपडेट देखील मिळेल. चला जाणून घेऊया फोनची इतर फीचर्स आणि संभाव्य किंमत.

oneplus 11 5g set to launch on 7 february check price specifications leak ahead of launch 2023
Viral Video : मालवणी 'चाँद नवाब' पाहिला का? तुफान व्हायरल होतंय आंगणेवाडीच्या जत्रेचं रिपोर्टींग

OnePlus 11 5G ची संभाव्य किंमत

कंपनीने फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण टिपस्टर अभिषेक यादव (@yabhishekd) ने OnePlus च्या आगामी फोनच्या किंमतीबद्दल दावा केला आहे. टिपस्टरने केलेल्या ट्विटनुसार, OnePlus 11 5G 11 फेब्रुवारीपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, तर फोन 14 फेब्रुवारीला विक्रीसाठी बाजारात दाखल जाईल.

त्यांनी सांगितले की हा फोन दोन स्टोरेज पर्याय 8GB + 256GB आणि 16GB + 256GB मध्ये ऑफर केला जाईल. नंतरचे व्हेरिएंट 61,999 रुपयांच्या किमतीत सादर केले जाईल. मात्र, दुसऱ्या व्हेरिएंटच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. फोनच्या किंमतीबाबत योग्य माहिती फोन 7 फेब्रुवारीला लॉन्च केल्यानंतर मिळेल.

oneplus 11 5g set to launch on 7 february check price specifications leak ahead of launch 2023
अदानींनी मागे घेतलेला FPO असतो काय? IPO पेक्षा काय असतं वेगळं? समजून घ्या सोप्या भाषेत

OnePlus 11 5G चे स्पेसिफिकेशन

OnePlus फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5G या वर्षाच्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. भारतात OnePlus 11 सह स्टेनलेस स्टील कॅमेरा मॉड्यूल दिले जाऊ शकते. असा दावा केला जात आहे की हा फोन भारतात 16 जीबी रॅम सह सादर केला जाईल.

तसेच, OnePlus 11 5G ला 6.7-इंचाचा 2K रिझोल्यूशन डिस्प्ले देखील मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, डिस्प्लेचे पॅनल AMOLED LTPO 3.0 असेल. फोनला स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 सह ColorOS 13 मिळेल. फोनमध्ये 16 GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 256 GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज मिळू शकते. फोनमध्ये वॉटर रेसिस्टंटसाठी IP68 रेटिंग उपलब्ध असेल.

OnePlus 11 5G कॅमेरा आणि बॅटरी

फोनमधील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, हॅसलब्लॅड ब्रँडिंगसह तीन रियर कॅमेरे यामध्ये दिले जाऊ शकतात. फोनमधील प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सलची Sony IMX890 सेन्सर असेल.

दुसरी लेन्स 32 मेगापिक्सेल Sony IMX709 टेलिफोटो पोर्ट्रेट लेन्ससह येईल आणि तिसरी लेन्स 48 मेगापिक्सेल Sony IMX581 अल्ट्रा वाईड अँगलसह येईल. OnePlus 11 5G ला सेल्फी आणि व्हिडिओसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.

OnePlus 11 5G च्या भारतीय व्हेरिएंटमधअये 5,000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळेल. हा फोन 100 वॉट चार्जिंगसह देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com