OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oneplus nord n20 se 5g cheapest phone ever check price and specifications

OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी

OnePlus ने आपला स्मार्टफोन OnePlus Nord N20 SE लाँच केला आहे. OnePlus Nord N20 SE हा कंपनीच्या Nord सीरीजचा नवीन फोन आहे आणि हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. OnePlus Nord N20 SE मध्ये Android 12 देखील देण्यात आला आहे. यापूर्वी OnePlus Nord CE 2 Lite 5G हा कंपनीचा सर्वात स्वस्त फोन होता, ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. OnePlus Nord N20 SE मध्ये ड्युअल स्पीकरसह एक मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह मोठी बॅटरी देखील दिली आहे.

OnePlus Nord N20 SE सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. OnePlus Nord N20 SE ची किंमत $199 म्हणजेच जवळपास 15,800 रुपये आहे. OnePlus Nord N20 SE ची विक्री चीनमध्ये 8 ऑगस्टपासून सुरू होईल. OnePlus Nord N20 SE हा फोन AliExpress वर लिस्ट केला आहे. OnePlus Nord N20 SE ब्लू ऑसिस आणि सेलेस्टियल ब्लॅकमध्ये खरेदी केले जाऊ शकते. भारतात याच्या लॉन्चबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: अखेर OnePlus 10T 5G भारतात लॉन्च; पाहा किंमत, स्पेसिफीकेशन्स

OnePlus Nord N20 SE मध्ये Android 132 सह OxygenOS 12.1 देण्यात आला आहे. यात 6.56 इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय त्याची बॉडी 2D स्लिम असून कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, या OnePlus फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. OnePlus Nord N20 SE सह ड्युअल स्पीकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आले आहे.

OnePlus Nord N20 SE मध्ये 33W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी मिळते, जी केवळ 30 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज होते. OnePlus Nord N20 SE ही Oppo A57 4G ची री-ब्रँडेड आवृत्ती आहे जो काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये लॉन्च झाली होता.

हेही वाचा: OnePlus चे सर्वात स्वस्त इयरबड लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Web Title: Oneplus Nord N20 Se 5g Cheapest Phone Ever Check Price And Specifications

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyOnePlus