डोळ्यांत पाणी न आणणारा कांदा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येतेच. हे पाणी येऊ नये म्हणून बरेच जण कांदा कापण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून पाहतात. जपानमध्ये मात्र कांदा कापण्याच्या पद्धती बदलण्यापेक्षा कांदाच बदलण्यात आला आहे! त्यांनी डोळ्यांत पाणी आणण्यासाठी कारणीभूत असलेल्या लॅक्रिमॅटोरी सिंथेज (एलएफ) या वि करांची मात्रा कमी केली आहे."हाउस फूड' ग्रुपकंपनीतील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

कांदा कापताच त्यातून प्रोपॅंथिअल एस-ऑक्‍साईड बाहेर पडून त्याची एलएफ विकरांसोबत रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे डोळ्यांतून पाणी येते. या प्रक्रियेत थियोसल्फायनेट तयार होते व त्यामुळे कांद्याला विशिष्ट वास येतो. या चाचण्यांदरम्यान, एलएफ तयार होण्यासाठी अलिनेजची गरज असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. प्रक्रियेदरम्यान या तीन घटकांपैकी एक घटक वगळला, तरी एलएफच्या पातळीत लक्षणीय घट होत असल्याचे आढळून आले. कांद्यावर आयन्सचा मारा केल्यास हे घटक निघून जात असून, एलएफ विकराची पातळी कमी होत असल्यामुळे हा कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येत नाही. व्यावसायिकरीत्या हे "डोळ्यांत पाणी न आणणारे'कांदे विकायचे की नाही, या वर अद्याप निर्णय झाला नसल्याचे कंपनीच्या प्रवक्‍त्यांनी स्पष्ट केले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion without eyes water