OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

Research Engineers Hiring : ओपन एआयचं अँपलशी टायअप,संशोधन अभियंत्यांची भरती सुरु
OpenAI Revives Robotics Team with New Engineer Hires
OpenAI Revives Robotics Team with New Engineer Hiresesakal

Robotics : OpenAI कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी रोबोटिक्सच्या दुनियेत पुन्हा एन्ट्री करणार आहे. कंपनीने रोबोटिक्स संशोधन संघ तयार करण्यासाठी संशोधन अभियंतांची (Research engineers) भरती सुरु केली आहे. 2020 मध्ये त्यांनी रोबोटिक्स विभाग बंद केला होता, पण आता ते अधिक प्रगत तंत्रज्ञान घेऊन या क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहेत.

OpenAI कंपनी फक्त रोबोट तयार करण्यावर भर देत नाही तर त्यांचे उद्दिष्ट आहे, अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करणे जेणेकरून इतर रोबोटिक्स कंपन्या त्यांच्या रोबोटमध्ये वापरू शकतील. यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात एक मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे.

OpenAI चे एआय मॉडेल वापरून Figure AI या कंपनीने तयार केलेल्या रोबोटने प्राथमिक स्वरुपातील बोलणे आणि विचार करण्याची क्षमता दाखवली आहे. हे OpenAI च्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगतीचे उदाहरण आहे.

OpenAI Revives Robotics Team with New Engineer Hires
Sunita Williams to Space : आजच तो ऐतिहासिक क्षण; भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स अंतराळात घेणार झेप, कुठे पाहाल लाईव्ह प्रक्षेपण?

याशिवाय, OpenAI च्या ChatGPT या अत्याधुनिक एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून Apple कंपनी त्यांच्या आयओएस 18 मध्ये सिरीला अधिक बुध्दीवान आणि प्रतिसाद देणारी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे तुमच्या फोनमधील व्हर्चुअल असिस्टंट सिरी आणखी चांगली आणि जलद मदत करू शकेल.

OpenAI Revives Robotics Team with New Engineer Hires
Pakistan Cyber Attack : पाकिस्तानकडून सायबर अटॅकचा 'धोका' वाढतोय

एकूणच, OpenAI ची कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स क्षेत्रातील कामगिरी भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दिशा बदलून टाकणारी ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com