Oppo Find N3 Flip : ओप्पोने भारतात लाँच केला स्टायलिश फ्लिप फोन; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Oppo New Flip Phone : यामध्ये क्रीम गोल्ड आणि स्लीक ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत.
Oppo Find N3 Flip
Oppo Find N3 FlipeSakal

फ्लिप फोनच्या मार्केटमध्ये सॅमसंग आणि मोटोचा दबदबा आहे. मात्र, या दोन्ही ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ओप्पोने आपला नवीन फ्लिप फोन लाँच केला आहे. Oppo Find N3 Flip असं या फोनचं नाव आहे. ओप्पोच्या आधीच्या फ्लिप फोनचं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यामध्ये नवीन चिपसेट, अपग्रेडेड कॅमेरा आणि कित्येक नवे फीचर्स दिले आहेत.

ओप्पो फाईंड एन3 फ्लिप या फोनमध्ये 3.26 इंच कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये मिनी अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. या डिस्प्लेमध्ये दिसण्यासाठी आतील अ‍ॅप्सचे हे मिनी व्हर्जन आहेत. यामुळे फोनच्या मागील बाजूस असणाऱ्या स्क्रीनवर देखील यूजर्स व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब म्युझिक, गुगल मॅप्स असे अ‍ॅप्स वापरू शकणार आहेत. यावर जास्तीत जास्त सहा नोटिफिकेशन्स दिसतील.

Oppo Find N3 Flip
Mobile Offers in Sale : अमेझॉन-फ्लिपकार्टचे सेल सुरू! 7-8 हजारांपासून मिळतायत 5G स्मार्टफोन; कुठे किती ऑफर?

डिस्प्ले

फोन उघडल्यानंतर त्याची मुख्य स्क्रीन 6.8 इंच एवढी आहे. हा AMOLED LTPO डिस्प्ले आहे. याचं रिझॉल्यूशन 1080x2520 पिक्सेल आहे. तसंच याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे. या डिस्प्लेची पीक ब्राईटनेस 1200 निट्स असणार आहे. फोल्डिंगसाठी ओप्पोने नवीन 'फ्लेक्सियन हिंज' वापरलं आहे. यामुळे स्क्रीन उघडल्यानंतर अगदी जाणवणार नाही असा क्रीज तयार होतो.

सॉफ्टवेअर

N3 फ्लिप फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9200 चिपसेट देण्यात आली आहे. तसंच, हा स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित ColorOS 13.2 वर काम करतो. या फोनसोबत चार वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स आणि पाच वर्षांपर्यंतचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

Oppo Find N3 Flip
Google Pixel 8 Launch : पिक्सेल 8 अन् बरंच काही.. 'मेड बाय गुगल' इव्हेंटमध्ये काय-काय होणार लाँच?

स्टोरेज आणि बॅटरी

यामध्ये 12GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 रॅम दिली आहे. या फोनमध्ये 4,300 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

Find N3 Flip मध्ये ट्रिपल50 कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP क्षमतेचा आहे. यामध्ये Sonyy IMX890 सेन्सर दिला आहे. यासोबतच एक 48 MP अल्ट्रावाईड आणि 32 MP टेलिफोटो लेन्स असणारा कॅमेराही यामध्ये दिला आहे. फोन उघडल्यानंतर आतल्या बाजूला 32MP पंच होल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये बाहेरच्या बाजूला असलेल्या स्क्रीनचा वापर करुनही फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करता येऊ शकतात.

Oppo Find N3 Flip
iPhone 15 Charging : घ्या! 'आयफोन 15'चा आणखी एक इश्यू समोर; पॉवर बँकने चार्ज होण्यास अडचण - रिपोर्ट

किंमत

Oppo Find N3 Flip या फोनची किंमत 94,999 रुपये एवढी आहे. यामध्ये क्रीम गोल्ड आणि स्लीक ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. याची प्री-बुकिंग सुरू झाली असून, 22 ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल. फ्लिपकार्ट, ओप्पो या वेबसाईट आणि सर्व प्रमुख रिटेलर्सकडे हा फोन उपलब्ध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com