Oppo च्या 'या' सहा कॅमेरावाल्या फोनवर 9000 रुपयांची धमाकेदार सूट

धमाकेदार ऑफर! Oppo च्या 'या' शानदार फोनवर 9000 रुपयांची सूट! मिळताहेत 6 कॅमेरे
Oppo
OppoSakal
Updated on
Summary

अनेक स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतील.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर (Online Shopping Website Flipkart) स्मार्टफोन (Smart Phone) इयर एंड सेल (Year End Sale) सुरू आहे. सेल 30 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. यादरम्यान अनेक स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतील. Oppo F17 Pro या Oppo च्या शानदार फोनवर सेलमध्ये 9 हजार रुपयांची सूट मिळत आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही ऑफरची गरज नाही. जाणून घेऊया याबाबत सविस्तर... (Oppo's F17 Pro is a great phone with a huge discount of Rupees nine thousand)

Oppo
'टाटा'चा 'हा' शेअर पुन्हा वधारला! दोन दिवसांत 10 टक्‍क्‍यांची उसळी

किमती अन्‌ ऑफर्स

Oppo चा हा स्मार्टफोन फक्त एकाच प्रकारात येतो. 8 GB RAM + 128 GB स्टोअरेज. फोनची MRP 25,990 रुपये आहे. तथापि, ते फ्लिपकार्टवर 16,990 रुपयांना विक्री केली जात आहे. म्हणजेच किमतीत थेट 9000 रुपयांची सूट आहे. जर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर देखील पाहिले तर ते तिथे 19,990 रुपयांना उपलब्ध होईल. ही किंमत फ्लिपकार्टवर कोणत्याही ऑफरशिवाय आहे.

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये 6.43 - इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्‍सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसरसह 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोअरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे (Micro SD Card) स्टोअरेज 256 GB पर्यंत वाढवता येते. सुरक्षेसाठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे.

Oppo
तुम्ही आयकरच्या कक्षेत येत नसाल तरी करा ITR फाईल! जाणून घ्या फायदे

सहा कॅमेरे येतात या फोनबरोबर

फोटोग्राफीसाठी (Photography) यात एलईडी फ्लॅशसह चार रिअर कॅमेरे आहेत. यात 48 - मेगापिक्‍सलचा प्रायमरी सेन्सर, 8 - मेगापिक्‍सेलचा सेकंडरी सेन्सर आणि दोन 2 - मेगापिक्‍सेल मोनोक्रोम सेन्सर आहेत. त्याच वेळी, सेल्फीसाठी 16 मेगापिक्‍सेल + 2 मेगापिक्‍सेलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. अशा प्रकारे फोनमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 4,015 mAh बॅटरी आहे, जी 30W VOOC फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com