Israel-Hamas War : पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्सचा धुमाकूळ; भारतासह कित्येक इस्राइल समर्थक देशांवर सायबर हल्ले वाढले

Cyber War : सायबर सुरक्षा फर्म असलेल्या चेकपॉइंट या संस्थेने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
Israel-Hamas War Cyber Attacks
Israel-Hamas War Cyber AttackseSakal

इस्राइल-हमास युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. कित्येक देशांनी आवाहन करुनही दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नाहीत. या युद्धाचे पडसाद आता सायबर जगतातही पहायला मिळत आहेत. पॅलेस्टाईनला समर्थन करणारे हॅकर्स इस्राइलला समर्थन देणाऱ्या देशांवर सायबर हल्ले करत आहेत. भारतावर देखील मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

सायबर सुरक्षा फर्म असलेल्या चेकपॉइंट या संस्थेने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. इस्राइल समर्थक असणाऱ्या देशांमध्ये भारत, अमेरिका, फ्रान्स आणि इटली अशा देशांचा समावेश आहे. या देशांवर होत असणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये हे युद्ध सुरू झाल्यापासून वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Israel-Hamas War Cyber Attacks
Israel War : 'इस्राइलचं अस्तित्व नष्ट करणार, 7 ऑक्टोबर सारख्या हल्ल्यासाठी तयार रहा'; हमासच्या अधिकाऱ्याचा इशारा

कोणत्या ग्रुप्सचा समावेश?

जगभरातील कित्येक सायबर ग्रुप्स यासाठी एकत्र आले आहेत. 'सायबर एरर सिस्टीम' या ग्रुपने गेल्या काही दिवसांमध्ये 200 पेक्षा जास्त सायबर हल्ले केले आहेत. 'मिस्टिरियस टीम बांगलादेश' या ग्रुपने देखील फ्रान्स, भारत आणि श्रीलंकेवर सायबर हल्ले केले आहेत. 'टीम इन्सेन्स पाकिस्तान' हा हॅकर्स ग्रुपदेखील या हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. (Global News)

गेमिंग जगतातही पडसाद

गेमिंग वर्ल्डमध्ये देखील या युद्धाचे पडसाद दिसत आहेत. रोबलॉक्स या गेमिंग प्लॅटफॉर्मवर कित्येक गेमर्स पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन आंदोलन करताना दिसून आले. हे गेमर्स इस्राइलच्या प्लेयर्सना टार्गेट करत होते. या गोष्टीवर इस्राइल सरकारने आक्षेप नोंदवताच, रोबलॉक्सने याबाबत चौकशी सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com