फूड टेक्‍नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवले ‘पान शॉट’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

एक नजर

  • शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलजी विभागातील फूड टेक्‍नॉलजी शाखेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘चे संशोधन. 
  • ‘पान शॉट’ हे नवीन डेझर्ट यामध्ये खाऊचे पान, बडिशेप, गुलकंद यासह व्हेनिला आईस्क्रीमचाही समावेश
  • यातील प्रत्येक घटक पचनक्रियेसाठी पूरक. 
  • मसालेदार किंवा मिष्टान्न भोजनानंतर ‘पान शॉट’ ची पचनास मदत. 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलजी विभागातील फूड टेक्‍नॉलजी शाखेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘पान शॉट’ हे नवीन डेझर्ट (जेवणानंतरण खाण्याचा गोड पदार्थ) बनवला आहे. यामध्ये खाऊचे पान, बडिशेप, गुलकंद यासह व्हेनिला आईस्क्रीमही आहे. यातील प्रत्येक घटक हा पचनक्रियेसाठी पूरक आहे. त्यामुळे मसालेदार किंवा मिष्टान्न भोजनानंतर ‘पान शॉट’ पचनास मदत करतो. विद्यापीठातील दीक्षान्त समारंभाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी जे विविध स्टॉल उभारले आहेत. तेथे पान शॉट उपलब्ध आहे.

हॉटेल्समध्ये किंवा एखाद्या समारंभात मसालेदार किंवा मिष्टान्न भोजन झाल्यानंतर ‘डेझर्ट’ दिले जातात. बहुदा यामध्ये आईस्क्रिमचा समावेश असतो. त्यानंतर काही हौशी मंडळी विविध प्रकारचे पान ही खातात. लोकांची ही सवय लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या फुट टेक्‍नॉलजीच्या विद्यार्थ्यांनी पान शॉट हा पदार्थ बनवला आहे. यात प्रत्येक घटकाचे कार्य, त्याची गुणवैशिष्ट्ये यांचा शास्त्रीय अभ्यास करून पान शॉट बनवण्यात आला आहे. 

पाैष्टिक आणि रुचकर पदार्थ असेल तर तो लोकांना आवडतो आणि त्यातून शरीराला वेगवेगळे पोषण घटकही मिळतात. पान शॉट हा पदार्थ दीर्घकाळ टिकण्यासाठी आम्ही काम करत आहे. 
- उत्कर्षा पंडित.
(विद्यार्थिनी, फूड टेक्‍नॉलजी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Pan Shot' made by Shivaji University Food Technology students