पाणीपुरी खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात तुम्हाला जर का पाणीपुरी खायची असेल तर , सुरक्षित पर्याय सापडला आहे . कोणता आहे तो पर्याय त्यासाठी वाचा .. 

पुणे : पाणीपुरीची एक एटीएम मशीन बाजारात आली आहे. हि एक वॉटर प्यूरीफायर मशीन असून ती कॉन्टॅक्टलेस आणि हायजिनिक आहे.या एटीएम मशीनचा व्हिडिओ खूप व्हायरल  होत आहे. सोशल मीडियावर या पाणीपुरी वेंडिंग मशीनचा  व्हिडिओ  खूप चर्चेत आहे. 

मशीनची खासियत 
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जर का , एखादी व्यक्ती एटीएम मशीनसारख्या दिसणा या  मशीनमध्ये पैसे टाकते आणि नंतर स्क्रीनवरील पुरी असलेल्या  पर्यायावर क्लिक करते आणि नंतर थोड्या वेळासाठी थांबल्यानंतर ते मशीनमधून गोलगप्पा म्हणजे पाणीपुरी तयार होऊन बाहेर येते.  हा व्हिडिओ रोझी नावाच्या ट्विटर हँडलवरून  शेअर केला गेला . तसेच कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की हे वॉटर प्युरिफिंग मशीन पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस आणि आरोग्यदायी आहे. तसेच या मशीनची सर्व बटणेही स्वच्छ केली आहेत. हे मशीन आता खूप प्रसिद्ध होणार हे नक्की . 

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दाखवले आहे कि एक व्यक्ती या मशीनच्या समोर उभे राहून आपल्याला मशीन कश्याप्रकारे कार्य करते हे समजून सांगत आहे.  यानंतर ती व्यक्ती दहा रुपयांची नोट काढून  मशीनमध्ये ठेवते आणि नंतर काहीकाळातच मशिनमधून पाणीपुरी बाहेर येते. 

पैशाच्या बदल्यात पाणीपुरी 
मशीनमधून पैसे आत जाताच मशीनच्या स्क्रीनवर उमटतात कि  'रक्कम जमा'. याचा अर्थ असा की आपण जमा केलेल्या रकमेनुसार गोलगप्पा आपल्या समोर येईल. नंतर थोड्या वेळाने डंपलिंग ग्राइंड स्क्रीनवर दिसून येईल. आणि या व्यक्तीने ते बटण दाबले आणि नंतर ट्रेमार्फत पाणीपुरी  मशीनच्या बाहेर जाण्यास सुरवात केली. मग आपण त्या गोल अश्या ट्रेमधून सहजपणे पाणीपुरी  बाहेर काढून ते खाऊ शकता. 

या व्हिडिओवर आतापर्यंत  हजाराहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या  आहेत. तसेच, त्याला 200 हून अधिक रिट्विट मिळाली आहेत. कमेंट्स मधे वा किती छान मशीन आहे. तर एकाने असे लिहले कि , सध्याच्या काळात आपल्याला या मशीनची गरज आहे. तर हि मशीन खूप खवय्यांसाठी चांगली आहे अशाप्रकारचे विविध येत आहेत. तुम्हीही पहा हि पाणीपुरीची एटीएम मशीन कशी आहे ते .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panipuri Vending Machine Video Goes Viral On Social Media