esakal | डॉमिनोज इंडिया हॅक; १० लाख ग्राहकांची माहिती लीक

बोलून बातमी शोधा

dominos india
डॉमिनोज इंडिया हॅक; १० लाख ग्राहकांची माहिती लीक
sakal_logo
By
शर्वरी जोशी

जगभरातील प्रसिद्ध पिझ्झा ब्रॅण्ड डॉमिनोजच्या डॉमिनोज इंडियावर सायबर हल्ला झाला आहे. डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटवर सायबर हल्ला करुन १३ जीबीचा अंतर्गत डेटा चोरण्यात आला आहे. चोरी करण्यात आलेल्या डेटामध्ये आयटी, लीगल, फायनान्स, मार्केटिंग, कर्मचाऱ्यांची माहिती आणि ऑपरेशन्सची माहिती होती. विशेष म्हणजे ही माहिती १८ कोटी ऑर्डर डिटेल्सच्या माध्यमातून मिळाल्याचा दावा हॅकर्सने केला आहे.

ज्यामध्ये ग्राहकांचे नाव, फोन क्रमांक, ई-मेल आयडी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व पेमेंट डिटेल्स आहेत त्यातून ही माहिती मिळाली असून यापैकी जवळपास १० लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स डार्क वेबवर गेल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्या ग्राहकांनी डॉमिनोजच्या अॅपवरुन ऑर्डर दिली होती, त्या ग्राहकांची माहिती डार्क वेबवर गेली आहे. इस्रायली सायबर क्राइम अंटेलिजन्सचे सहसंस्थापक Alon Gal यांनी याविषयी सविस्तर खुलासा केला आहे. मात्र, अद्यापतरी याविषयी डॉमिनोज इंडियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डॉमिनोज इंडियाचा हॅक झालेला डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आला असून हॅकर्सने त्यासाठी चार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसंच हे हॅकर्स हा डेटा फक्त विक्रेत्यांनाच विकणार असल्याचं Alon Gal यांनी सांगितलं.