गुगल घेऊन आलाय Recorder!

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

आपण जे बोलू ते गुगल या अॅपच्या माध्यमातून टाईप करणार आहे. या नव्या अॅपचे नाव Recorder असे देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : सर्च इंजिनपैकी एक असलेल्या Google चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोन युजर्ससाठी गुगलने आपले नवे अॅप लाँच केले आहे. त्यानुसार आपण जे बोलू ते गुगल या अॅपच्या माध्यमातून टाईप करणार आहे. या नव्या अॅपचे नाव Recorder असे देण्यात आले आहे.

Google ने Pixel 4 सीरीजचे स्मार्टफोन्स 15 ऑक्टोबरला लाँच केले आहेत. या फोनमध्ये हे अ‍ॅप देण्यात आले असून, त्यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहे. हे अ‍ॅप इतर अ‍ॅपपेक्षा वेगळे आहे. Recorder या अ‍ॅपच्या मदतीने ऑडिओनुसार टेक्स्ट टाईप करता येणार आहे. गुगलचे Recorder हे अॅप स्पीच प्रोसेससिंग आणि रिकॉग्निशनवर काम करत आहे. यामुळे आता लवकरच युजर्सच्या फोनमधील व्हॉईस रेकॉर्डिंगचा अनुभव बदणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

रेकॉर्डिंग होणार टेक्स्टमध्ये

Google च्या Recorder या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स अगदी सहजपणे रेकॉर्डिंग्स टेक्स्टमध्ये काही मिनिटांत बदलू शकतात. मीटिंग, लेक्चरमध्ये याचा वापर होणार आहे. 

इंग्रजी भाषेतच असणार

Recorder हे अ‍ॅप सध्या फक्त इंग्रजी भाषेत काम करणार आहे. मात्र, लवकरच अन्य भाषांमध्येही हे अॅप सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pixel 4s Recorder app can capture and transcribe simultaneously which is English