IMC 2023 : '6G तंत्रज्ञानात भारत जगाचं नेतृत्व करेल', PM मोदींनी व्यक्त केला विश्वास! 5G प्रयोगशाळांचं केलं उद्घाटन

दिल्लीमध्ये आजपासून इंडिया मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली आहे.
IMC 2023 100 5G Labs
IMC 2023 100 5G LabseSakal

दिल्लीमध्ये आजपासून इंडिया मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली आहे. आज (27 ऑक्टोबर) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. यासोबतच PM मोदींनी देशभरातील 100 5G प्रयोगशाळांचं देखील उद्घाटन केलं.

दि फ्युचर इज हिअर

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की "टेक्नोलॉजीमध्ये आज दररोज वेगाने बदल होत आहे. त्यामुळेच आपण म्हणतो - दि फ्युचर इज हिअर अँड नाऊ! मी याठिकाणी असलेल्या स्टॉल्समध्ये याच भविष्याची झलक पाहिली. टेलिकॉम, टेक्नॉलॉजी, कनेक्टिव्हिटी, एआय, सायबर सिक्युरिटी, सेमिकंडक्टर, 6G, ड्रोन, डीप सी किंवा स्पेस, ग्रीन टेक किंवा अन्य कोणतेही सेक्टर्स असो.. येणारा काळ हा अगदी वेगळाच असणार आहे."

6G मध्ये लीडर होणार भारत

पंतप्रधान पुढे म्हणाले, की भारतात वेगाने 5G चा विस्तार होत आहे. एवढंच नाही, तर 6G क्षेत्रातही आपण लीडर होण्याच्या दृष्टीने पुढे जात आहोत. आमच्या सरकारच्या काळात 4G चा विस्तार झाला, मात्र आमच्यावर एकही डाग लागला नाही. 6G क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल असा मला विश्वास आहे."

2G स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन काँग्रेसला टोला

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी यूपीए सरकारच्या काळात झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, की 2Gच्या वेळी जे झालं ते सर्वांनाच माहिती आहे. मात्र, मी त्याबाबत आता बोलणार नाही. नाहीतर मीडियावाले केवळ तोच मुद्दा पकडून बसतील, आणि बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करतील.

इंडियन मोबाईल काँग्रेस ही परिषद 27 ते 29 ऑक्टोबर असे तीन दिवस असणार आहे. यामध्ये सुमारे 400 हून अधिक स्टार्टअप कंपन्या आपली उत्पादने सादर करतील. 22 देशांमधील एक लाखांहून अधिक प्रतिनिधी याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 5 हजारांहून अधिक CEO स्तरावरील अधिकारी असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com