
पोको M7 प्लस मध्ये 7,000mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि स्लिम डिझाइन आहे.
यात 6.98 इंचांचा 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा असेल.
हा फोन स्नॅपड्रॅगन 6s जेन 3 चिपसह फ्लिपकार्टवर लाँच हो
पोको, स्मार्टफोनच्या दुनियेत आपल्या किफायतशीर आणि शक्तिशाली फोन्ससाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड भारतात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. जरी कंपनीने अधिकृत नाव जाहीर केले नसले, तरी चर्चांनुसार हा फोन Poco M7 Plus असण्याची शक्यता आहे. हा फोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या पोको M6 प्लसचे पुढचे व्हर्जन असेल. पोकोने या नव्या फोनबाबत उत्सुकता वाढवली असून यात 7000mAh क्षमतेची सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि स्लिम डिझाइन असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.