esakal | ‘गुगल अर्थ’ देणार प्रत्यक्ष भेटीचा ‘फील’
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुगल अर्थ’ देणार प्रत्यक्ष भेटीचा ‘फील’

‘गुगल अर्थ’ देणार प्रत्यक्ष भेटीचा ‘फील’

sakal_logo
By
प्रफुल्ल सुतार

घरबसल्या जगभरातील ठिकाणे शोधण्यासाठीचा वाटाड्या म्हणून ‘गुगल अर्थ’ची (Google Earth) ख्याती आहे. लोकप्रिय ठिकाणांबरोबरच हॉटेल, रेस्टॉरंटसह घर शोधण्यासाठीही याची मोठी मदत होत असते. याच गुगल अर्थवर आता जगभरातील लोकप्रिय ठिकाणे पाहण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या ठिकाणी असल्याचा ‘फील’ मिळणार आहे. त्यासाठी ‘व्हीआर हेडसेट’ (VR) ची गरज लागणार आहे. ‘गुगल अर्थ’च्या व्हर्च्युअल रिॲलिटी ॲपमध्ये असे एक फिचर देण्यात आले आहे, की ज्यामुळे एखादे ठिकाण पाहण्याबरोबरच आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी असल्याचा भास होणार आहे. याबरोबरच यातील ‘थ्रीडी’ फिचरमुळे प्रत्यक्ष झेपावण्याचा अनुभवही मिळू शकेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

गुगल अर्थच्या ‘व्हीआर’ या नव्या फिचरचा वापर करून युजर्सना त्यांच्या आवडत्या ठिकाणाची निवड करता येईल. मात्र, त्या ठिकाणाचे नाव अथवा पत्ता माहीत असायला हवा. म्हणजे, समजा आग्रा हे ठिकाण निवडले, तर त्या ठिकाणातील ‘ताजमहाल’ अथवा अन्य ठिकाणाचे नाव अथवा त्या परिसराची माहिती द्यावी लागेल.

खरेतर, गुगल अर्थवरील युजर्सना त्यांना आवडत्या ठिकाणाची माहिती शोधण्यात अधिक रस असतो. मग, त्यांचे मूळ गाव असो अथवा लहानपणी राहत असलेले ठिकाण असो, की पर्यटनासाठी जाण्यासाठीचे ठिकाण असो.

युजर्सना नव्या फिचरचा वापर करताना ठिकाणाची निश्‍चिती करावी लागेल. की, ज्या ठिकाणाची ‘थ्रीडी हेडसेट’द्वारे ते सफर करू शकतील. गुगलने ‘अर्थ व्हीआर’वर निश्‍चित केलेल्या २७ ठिकाणांवरही जाता येईल. यामध्ये अर्जेंटिनातील पेरीतो मोरॅनो तसेच दक्षिण अफ्रिकेतील ‘टेबल माऊंटेन’चा समावेश आहे.

loading image