Renault Kiger Car : कायगरची क्रेझ कायम

या कारची एक्स शोरूम किंमत ६.५० लाख ते ११.२३ लाख रुपये इतकी
Renault Kiger car
Renault Kiger carsakal
Summary

कायगरची एक्स शोरूम किंमत ६.५० लाख ते ११.२३ लाख रुपये इतकी

- प्रणीत पवार

‘आरएक्सझेड एक्स-ट्रॉनिक टर्बो डीटी’ व्हेरिएंटची राईड नुकताच केली. कामगिरीच्या बाबतीत कायगर तितकीच मजबूत वाटली. फक्त मायलेजच्या बाबतीत या व्हेरिएंटनेे थोडे नाराज केले.

कायगरमध्ये ऑटोमेटिक आणि मॅन्युअल ट्रान्स्मिशन मिळून एकूण १९ व्हेरिएंट येतात. ‘आरएक्सई’ हे तिचे बेस; तर ‘आरएक्सझेड टर्बो सीव्हीटी डीटी’ (एक्स-ट्रॉनिक) हे तिचे नवे टॉप व्हेरिएंट आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत ६.५० लाख ते ११.२३ लाख रुपये इतकी आहे. कायगर २०२१मध्ये लाँच झाल्यानंतर २०२२मध्ये काही फीचर्स आणि इंटर्नल-एक्सटर्नल बदल करून हे एक्स-ट्रॉनिक व्हेरिएंट लाँच करण्यात आले. कायगरच्या या टॉप व्हेरिएंटच्या राईडचा अनुभव घेतला. यामध्ये ९९९ सीसी क्षमतेचे, ३ सिलिंडर ४ वॉल्व्ह, १.० लिटर टर्बो इंजिन दिले असून, जे ५००० आरपीएमला ९८.६३ बीएच पॉवर आणि ४४०० आरपीएमला १५२ एनएम टॉर्क जनरेट करते.

कायगरमध्ये नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बो चार्ज्ड इंजिन असे दोन पर्याय दिले आहेत. शिवाय नॉर्मल, ईको आणि स्पोर्ट्स आदी तीन ड्रायव्हिंग मोड्स मिळतात. टर्बो चार्ज इंजिन सीव्हीटी गिअर बॉक्सला चांगले ट्युन केल्याने ही कार कोणत्याही रस्त्यावर हवी त२शी ताकद देते. अगदी चढावावरही सुलभ ओव्हरटेकिंगची खात्री मिळते.

सीव्हीटी गिअर बॉक्समुळे गिअर शिफ्टिंग जाणवत नाही. त्यामुळे धक्के बसण्याचा प्रश्नच येत नाही. स्टेअरिंगही अगदी स्मूथ दिल्याने कार एका बोटानेही वळवू शकतो. नॉर्मल मोडमध्ये ६० ते ८० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगात ही कार चालवली, तरी सरासरी १३ ते १४ चे मायलेज दिले. मॅन्युअल ट्रान्समिशनला हेच मायलेज १८ ते १९ च्या आसपास दिले.

कायगरचा लूक याच श्रेणीतील इतर कारपेक्षा अधिक आक्रमक वाटतो. कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील असली, तरी टिपिकल एसयूव्ही राईड करत असल्याचा फील येतो. सीट उंचीनुसार खाली-वर करता येत असल्याने दृश्यमानता चांगली मिळते. पुढे आणि पाठीमागील सीटवरही अंडर थाय सपोर्ट चांगला मिळतो, त्यामुळे लांबच्या प्रवासात अडचण येत नाही.

वातानुकूलन यंत्रणाही (एसी) वातावरण तात्काळ थंड करते. ड्रायव्हिंग सीटवर आर्म रेस्टमुळे सीट बेल्ट लावताना अडचण येते. शिवाय पाठीमागील दृश्यमानता थोडी कमी वाटली. तरीही कायगरची मजबुती, कामगिरी आणि लूक हा निकष ठेवल्यास ज्यांना ‘बॉक्सी’ लुक आवडतो, अशांसाठी ही कार आजही चांगला पर्याय ठरू शकतो.

हे आहेत बदल

  • कायगर टर्बो एक्स-ट्रॉनिक व्हेरिएंटमध्ये पुढे बंपरच्या खाली राखाडी रंगाची स्किट प्लेट, ॲलॉय व्हीलमध्येही मध्यभागी लाल रंग, डोअरवर टर्बोची बॅजिंग येते. डोअर हँडल्स ब्लॅक कलरमध्ये दिले आहेत. पाठीमागे बूट डोअरला क्रोम इफेक्टही येतो, ज्यामुळे कार अधिक स्पोर्टिव्ह दिसते.

  • कायगरच्या आतमध्ये स्टेअरिंग, सीट्स, गिअर लिव्हरला रेड स्टिचिंग (लाल रंगाच्या धाग्याने शिवणकाम) केले आहे. डॅशबोर्डवरही चॉकलेटी रंगाचे फिनिशिंग आहे. क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जिंगची सुविधाही नव्याने दिली आहे.

फीचर्स आणि सुरक्षा

कायगरमध्ये ८ इंच टच स्क्रीन, ८ स्पीकर साऊंड सिस्टिम, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, चिल्ड ग्लोव्ह बॉक्स, ७ इंच फूल एलसीडी ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार प्ले आदी फीचर्स आहेत. दोन ग्लोव्ह बॉक्स, बॉटल होल्डर, सेंट्रल आर्मरेस्ट आदी मिळून २९ लिटरचा स्टोरेज कारच्या आतील बाजूमध्ये मिळतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायगरमध्ये ड्युअल एअर बॅग, ईबीडी-एबीएस, व्हेरिएंटनुसार साईड एअर बॅगही उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com