esakal | सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 स्मार्टफोनमधील प्रायव्हसी फिचर उतरतंय लोकांच्या पसंतीस
sakal

बोलून बातमी शोधा

सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 स्मार्टफोनमधील प्रायव्हसी फिचर उतरतंय लोकांच्या पसंतीस

या दोन फोनमधील दर्जेदार कॅमेरा फिचर्सही तुम्हाला नक्की आवडतील.  यातील सगळ्यात वरती आहे सिंगल टेक आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 स्मार्टफोनमधील प्रायव्हसी फिचर उतरतंय लोकांच्या पसंतीस

sakal_logo
By
जाहिरात

सॅमसंगचे क्विक स्विच फिचर तुम्हाला पॉवर बटणवर दोनदा क्लिक करुन खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन वर्जनमध्ये प्रवेश करु देते. यामुळे तुम्ही तुमची गॅलरी, वेब ब्राऊझर WhatsAap आणि इतर Apps दुसऱ्यांपासून सुरक्षित ठेवू शकता.  

पार्टनर फिचर, एचटी ब्रँड स्टूडिओ

सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आपला वेळ स्मार्टफोनवर घालवते. स्नॅपचॅट किंवा इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करण्यासाठी, किंवा फेसबुक मॅसेंजर आणि WhatsAap च्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. तरुण पिढी कोणत्याही गॅजेटपेक्षा स्मार्टफोनचा जास्त वापर करते. आता सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71 स्मार्टफोनने तरुण पिढीसमोर एक नवीन जग खुलं केलं आहे. स्मार्टफोनमध्ये सुपर अमोलेड डिसप्ले, क्वाड-कॅमेरा सेटअप आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे.

आणखी विशेष म्हणजे मिलेनिअल्स आणि Z जनरेशनला आता टेंशन मुक्त आणि मनासारखे Alt Z जीवन जगता येणार आहे. येथे तुम्ही तुमचे खाजगी क्षण खाजगी ठेवू शकता, आणि इतर कोणाला त्यात प्रवेश करता येणार नाही. उद्योगविश्वातील पहिल्या खाजगीपणाच्या नवकल्पनेला, क्विक स्वीच आणि इंटेलिजेन्ट कंटेंट सजेशनचा जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल, त्यानंतर तुम्ही कधीही मागे फिरुन पाहणार नाही.  

खाजगीपणा पहिल्यांदा!

जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन दररोज वापरत असाल, तर तुम्हाला तुमचा खाजगीपणा जपला जावा असं नक्की वाटत असेल. आपल्याला असा अनुभव आला असेल की, कोणीतरी आपला फोन फोटो काढण्यासाठी घेतात आणि त्यानंतर ते आपल्या सर्व खाजगी गोष्टी  पाहून टाकतात. अनेक वेळा आपले मित्र किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य आपला स्मार्टफोन घेतात आणि जे पाहिला नको होते असे मॅसेज पाहतात. आपला सर्व महत्वाचा खाजगी डाटा स्मार्टफोनमध्ये साठवलेला असतो, इतर कोणाच्या हाती मोबाईल गेल्यास चिंता वाटणे साहजिक आहे. तुम्हाला ही चिंता मिटवण्यासाठी फक्त पॉवरचे बटण दोनदा क्लिक करण्याची गरज आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी  A51 आणि गॅलेक्सी A71 स्मार्टफोनमध्ये क्विक स्विच नावाचे अद्वितीय फिचर आहे. 

हे अधिक चांगल्यारितीने समजून घेण्यासाठी अभिनेत्री राधिका मदनच्या जीवनातील एक उदाहरण घेऊ या. व्हिडिओमध्ये, ती बॉयफ्रेंडला (सनी सिंगने हे पात्र साकारले आहे) त्याच्या वाढदिवसादिवशी सरप्राईज देण्याची योजना बनवत आहे. त्यासाठी राधिका सनीच्या भेटीसाठी तयार नव्हती आणि तिला कोणत्याही परिस्थितीत तिचं सरप्राईज वाया जाऊ दद्यायचा नव्हतं,अशा परिस्थितीत तिने सिक्रेट जपण्यासाठी क्विक स्विचचा वापर केला. 

क्विच स्विचमुळे तुम्ही तुमचा मोबाईल कोणालाही फोटो काढण्यासाठी देऊ शकता. तसेच तुमच्या मित्राला युट्यूबवरील व्हिडिओ पाहण्यासाठीही मोबाईल कोणत्याही चिंतेशिवाय देऊ शकता. स्मार्टफोन इतराला देताना तुम्हाला पॉवर बटन केवळ दोनदा क्लिक करायचं आहे, ज्याने तुमची गॅलरी, ब्राऊझर, WhatsAap आणि खूप काही खाजगी राहिल.  तसेच, AI-पॉवर्ड कंटेंट सजेशन तुम्हाला तुमची एखादी इमेज खाजगी ठेवण्यासाठी सूचवू शकते. याचा सेट-अप सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला काही ठराविक चेहरे आणि इमेजेस निवडायचे आहेत, त्यानुसार इमेजस आपोआप खाजगी फोल्डरमध्ये पाठवलया जातील. कंटेंट सजेशन सॅमसंग नॉक्सने सुरक्षित आहे, हे एक सुरक्षित प्लॅटफोर्म आहे. तुमचा खाजगीपणा आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. 

या दोन फोनमधील दर्जेदार कॅमेरा फिचर्सही तुम्हाला नक्की आवडतील.  यातील सगळ्यात वरती आहे सिंगल टेक आहे. जेव्हा तुम्हाला कोणती फ्रेम उत्तम असेल याबाबत खात्री नसेल, त्यावेळी सिंगल टेक कामाला येते. तुम्हाला फक्त फोनमध्ये सिंगल टेक ऑपशन सिलेक्ट करायचा आहे. हे फिचर वेगवेगळ्या प्रकारचे 10 फोटो (7 फोटो आणि 3 व्हिडिओ) कॅप्चर करते. सिंगल टेक तुमचे सर्वोत्तम शॉट आणि क्षण अल्बममध्ये जतन करते. कॅमेरा सॉफ्टेवेअर आपोआप छोटे व्हिडिओ, जीआयएफ अॅनिमेशन,  काही स्टायलिश इमेजेस आणि खूप काही AI च्या मदतीने घेते. तुम्हाला सर्वोत्तम शॉट सहजतेने निवडता येतो आणि तुम्ही ते तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु शकता. केवळ एका क्लिकवर शेअर, हे खूप सोयीस्कर आहे.

नाईट हायपरलेप्स

या स्मार्ट फोनमध्ये पुढचे महत्वाचे फिचर नाईट हायपरलेप्स आहे. सोशल मीडियावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की, जनरेशन Z आणि मिलेनिअल्स दररोज अनेक फोटो घेत असतात. हॉटेलमध्ये असताना किंना एखाद्या पार्कमध्ये फिरत असताना अनेकदा फोटो घेतले जातात. नाईट हायपरलेप्सच्या मदतीने तुम्ही अंधूक प्रकाशातही चांगला फोटो घेऊ शकता. त्यामुळे तुमचा कोणताही क्षण मिस होणार नाही. याशिवाय कॅमेरामध्ये अनेक प्रमुख फिचर्स आहेत. यात कस्टम फिल्टर, क्विक व्हिडिओ रेकॉर्डिंग,  रेकॉर्डिंग करताना कॅमेरा स्विच ( सध्या गॅलेक्सी A51 वर), AI गॅलरी झूम आणि
स्मार्ट सेल्फी अँगल यांचा समावेश होतो. 

Alt Z लाईफचा अनुभव घ्या

इतर कोणी आपला स्मार्टफोन हाताळताना चिंता करण्याचे दिवस आता गेले आहेत. आता कोणत्याही काळजीशिवाय जगता येईल, त्यासाठी सॅमसंगला धन्यवाद. गॅलेक्सी  A51 आणि A71 स्मार्टफोन खरोखरच ग्राऊंडब्रेकिंग आहेत. क्वाड कॅमेरा सेट-अप जो शूटचा मजेशीर अनुभव देईल. उत्तम अँगल याशिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे याची बँटरी पूर्ण दिवसभर राहते. आणखी दुसरे काय हवंय? या सर्व वैशिष्ठ्यांसह गॅलेक्सी  A51 आणि A71 स्मार्टफोन तुम्हाला Alt Z लाईफ जगण्यासाठीही मदत करेल. जर तुम्ही मोबाईल घेण्याचा विचार करताय, मग वाट कशाची पाहताय?

loading image
go to top