कार, ​​बाईक किंवा स्कूटर, 5 मिनिटांत ठिक करा पंक्चर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रवासादरम्यान गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागते.
Process to Repair Puncture of Tire
Process to Repair Puncture of TireSakal

Process to Repair Puncture of Tire: अनेकदा आपण प्रवासात असताना आपल्या गाडीचा टायर पंक्चर होतो. अशावेळी जवळपास पंक्चरचं दुकान मिळालं तर ठिक नाहीतर मग आपल्याला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागते. कधी-कधी अनेक किलोमीटरवर पंक्चरचे दुकान नसलेल्या ठिकाणी टायर पंक्चर होतात. अशावेळी पंक्चर दुरुस्ती किटच्या मदतीने तुम्ही ही समस्या सोडवू शकता. हे किट सर्व कार तसेच बाईक आणि स्कूटरमध्ये काम करते. शिवाय तुम्ही ते तुमच्यासोबत सहजपणे घेऊन जाऊ शकता.

Process to Repair Puncture of Tire
Mahindra Scorpio: स्कॉर्पिओ लॉन्चची तारीख आली जवळ; फोटो अन् फिचर्स लीक

5 मिनिटांत पंक्चर करा ठिक-

तसं पाहिले तर ट्यूबलेस टायर सहजासहजी पंक्चर होत नाहीत. अनेकवेळा पंक्चर झाल्यानंतरही त्यांच्यापासून अनेक किलोमीटरपर्यंतचा प्रवास करता येतो. परंतु तरीही हे किट तुमच्याकडे ठेवावे. हे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा निर्जन ठिकाणी किंवा रात्रीच्या वेळी टायर पंक्चर होतात आणि पंक्चर दुरुस्तीचे दुकान सापडले नाही तर तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत या किटच्या सहाय्याने पंक्चर 5 मिनिटांत दुरुस्त करता येते. या किट्सची ऑनलाइन किंमत फक्त 125 रुपयांपासून सुरू होते.

Process to Repair Puncture of Tire
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या रात्रीतून १७ बस पंक्चर

सोपी पंक्चर दुरुस्ती प्रक्रिया-

ट्यूबलेस टायरचे पंक्चर दुरुस्त करणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त टायरचा तो भाग शोधायचा आहे जिथे पंक्चर आहे. या ठिकाणी तीक्ष्ण वस्तू असू शकते. ती पक्कडीच्या साहाय्याने ओढून त्या जागेवर रॅमरच्या साहाय्याने पंक्चर पट्टी लावली जाते, त्यानंतर टायरमधून बाहेर येणारी पट्टी कटरने कापली जाते. आता एअर पंपच्या मदतीने आपण टायरमध्ये हवा भरतो. स्ट्रीप लावण्यासाठी टायर कुठे पंक्चर झाला आहे हे देखील तुम्ही चिन्हांकित करू शकता. एकदा पट्टी आत गेल्यावर, पंक्चर दुरुस्त केले जाते आणि तुमची गाडी पुढील प्रवासासाठी सज्ज होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com