Amazon Project Kuiper : मस्कला टक्कर देणार अमेझॉन, 'स्टारलिंक'प्रमाणे स्वतःची सॅटेलाईट इंटरनेट सेवा करणार सुरू

यासाठी अमेझॉनने २१० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
Amazon Project Kuiper
Amazon Project KuipereSakal

थ्रेड्स लाँच झाल्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या इलॉन मस्कचं टेन्शन आता आणखी वाढलं आहे. सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टारलिंक या कंपनीला आता अमेझॉन टक्कर देणार आहे. स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अमेझॉनने २१० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

अमेझॉनने काही दिवसांपूर्वी अशी घोषणा केली होती, की नासाच्या कॅनडी स्पेस सेंटरमध्ये ते १२० डॉलरच्या निधीची गुंतवणूक करणार आहेत. याठिकाणी सॅटेलाईट कंस्ट्रक्शन फॅसिलिटी बनवण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलॉन मस्कच्या स्टारलिंक कंपनीला टक्कर देण्यासाठीच्या योजनेचा हा भाग असल्याचं अमेझॉनने स्पष्ट केलं होतं. (Amazon Satellite Internet)

Amazon Project Kuiper
Elon Musk Tweet : ट्विटरचा पक्षी होणार गायब? इलॉन मस्कने धडाधड ट्विट करत दिले संकेत; मोठे बदल अपेक्षित

प्रोजेक्ट कुईपर

अमेझॉनने या प्रकल्पाचं नाव प्रोजेक्ट कुईपर (Amazon Project Kuiper) असं ठेवलं आहे. यामध्ये पृथ्वीच्या अंतराळ कक्षेत 3,200 हून अधिक सॅटेलाईट सोडले जातील. या सॅटेलाईटच्या माध्यमातून जगभरातील दुर्गम भागांमध्ये इंटरनेट पुरवले जाईल. पुढील वर्षी हा प्रोजेक्ट लाँच होऊ शकतो, अशी माहिती कुईपर प्रॉडक्शन ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष स्टीव्ह मेटायर यांनी दिली.

अमेझॉनकडे कॅनडी स्पेस सेंटरमधील फॅसिलिटीव्यतिरिक्त वॉशिंग्टनच्या किर्कलँडमध्ये आणखी एक प्रॉडक्शन युनिट आहे. या वर्षीच्या अखेरीस तिथे काम सुरू होईल. यानंतर सॅटेलाईट फायनल चाचणीसाठी फ्लोरिडाला पाठवण्यात येतील. ब्लू ओरिजिन आणि युनायटेड लाँच अलायन्स (ULA) चे रॉकेट वापरून हे सॅटेलाईट लाँच केले जातील.

Amazon Project Kuiper
Elon Musk Twitter : ट्विटरवर आता मेसेज पाठवण्यालाही लिमिट लागू, सबस्क्राईबर वाढवण्यासाठी मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com